केईएममध्ये यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया


SHARE

सध्या दिवसेंदिवस अवयवदानाबाबत जनजागृती वाढताना दिसत आहे. परळच्या केईएम रुग्णालयात नुकतीच यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगेश गोठणकर (वय वर्षे 40) यांच्यावर हे यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात मंगेश यांच्या कुटुंबीयांनी यकृत मिळण्यासाठी नोंद केली होती. अखेर, त्यांच्यावर या वर्षी सप्टेंबर महिन्यात यकृत प्रत्यारोपण केलं गेलं.

आम्ही खूप खूष आहोत. पण, ज्यांनी त्यांना यकृत दान केलंय, त्यांच्यासाठी दु:ख देखील आहे. गेले दीड वर्ष ते यकृतासाठी वाट बघत होते.

अक्षदा गोठणकर, मंगेश यांच्या पत्नी  यकृत मिळावं म्हणून मंगेश यांच्या कुटुंबियांनी भरपूर ठिकाणी फेऱ्या मारल्या. शिवाय, रुग्णालयातून प्रत्यारोपणाचा खर्च देखील 8 ते 9 लाख रुपये एवढा सांगितला होता. त्यासाठी काही सामाजिक संस्था किंवा अन्य रुग्णालयातून फंड गोळ्या करण्यात आल्याची माहिती मंगेश यांच्या बहीण दिपाली सावंत यांनी दिली.

मंगेशच्या औषधांचा खर्च आता ऑपरेशननंतरही बराच आहे. गेल्या दीड वर्षात सर्व उपचारांचा खर्च जवळपास अडीच लाख झाला असेल. आम्हाला आशा नव्हती की त्याला यकृत मिळेल. पण, लोकांमध्ये वाढलेल्या अवयवदानासंदर्भातील जनजागृतीमुळे हे शक्य झालं.

दीपाली सावंत, मंगेश यांच्या बहीणहेही वाचा

5.5 किलोच्या सर्वात मोठ्या ट्यूमरची गिनीज बुकमध्ये नोंद


संबंधित विषय