Advertisement

मुंबई तापली...


मुंबई तापली...
SHARES

गेले दोन दिवस मुंबईचा पारा 35 अंशांवर कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांना उष्णतेसोबत घामाच्या धारांचाही त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येत्या 24 तासात हा पारा चढता राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 17 ते 20 एप्रिलपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

विदर्भातही उष्णतेची लाट कायम आहे. चंद्रपुरात आतापर्यंत 45.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झालीय. तर, सोमवारी मुंबईतील कुलाब्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर सांताक्रूझ येथील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे, तापमानात आणखी वाढ होणार असून पुढील 24 तासांत मुंबईचा पारा आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा