आठवडाभर स्थिर असेलल्या मुंबईच्या तापमानात बुधवारी थोडासा बदल दिसून आला. मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा 33 अंशावरून चढत थेट 34 अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे उकाडा आणि उष्णतेच्या झळा आणखी बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत सांताक्रुझ येथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. कुलाब्यातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुढील काही दिवस हे तापमान 34 अंशावरच कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना पाणी, तोंडाला मास्क, शक्यतो शरीराला संपूर्ण झाकणारे कपडे परिधान करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.