परळ - डॉक्टरांच्या संपामुळे अनेक रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक त्रस्त असल्याचे चित्र मुंबई शहरातल्या महत्वाच्या रुग्णालयांमध्ये पाहायला मिळाले. मात्र त्यातही या रूग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी काही हात पुढे आले.
रुग्णांना योग्य ती सुविधा उपचार मिळत नसल्यामुळे त्रस्त नातेवाईक रुग्णालय परिसरात अन्न पाण्याची परवा न करता बसले होते. अशा नातेवाईकांसाठी परळमध्ये रहात असलेल्या अनुजा चौबे आणि ज्योती देव यांनी शुक्रवारी के इ एम रुग्णालयाबाहेर व्हेज बिर्याणी वाटप केली.
या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता आम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीची अपेक्षा नाही. बातम्यांमध्ये रुग्णांचे होणारे हाल पाहून हे अन्न दान करत आहोत, असे त्या या वेळी म्हणाल्या.