कॅन्सर पीडितांच्या मदतीसाठी अनोखा बाजार

 Mumbai
कॅन्सर पीडितांच्या मदतीसाठी अनोखा बाजार
Mumbai  -  

लोअर परळ - हेल्पिंग हँड फाऊंडेशनच्या वतीनं टाटा मेमोरिअल रुग्णालयातील कॅन्सर पीडित मुलांना मदत करण्याच्या हेतूने बुधवारी लोअर परळ येथील रेगीस हॉटेलमध्ये विविध वस्तूंचे बाजार भरवण्यात आले होते. या वस्तूंच्या विक्रीनंतर जी मिळकत येणार त्यातून कॅन्सर पीडित मुलांवर उपचार केले जाणार असल्याची हेल्पिंग हँड फाऊंडेशनच्या संस्थापिका माधवी गोएंका आणि मेघना पटेल यांनी संगितलं. या बाजारात फराह अली खान, श्रेया सोम, सीमा खान, कनिका कपूर, मिताली व्होरा यांची उपस्थिती होती.तर यामध्ये डॉली सिद्धावानी, भावना पांडे आणि अर्चना राव या प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या वस्तू विकण्याकरता ठेवण्यात आल्या होत्या. ज्यात बूट, बॅग, कपडे आणि अशा विविध वस्तूंचा समावेश होता. या उपक्रमाला बॉलिवूड अभिनेता इमरान खान यानेही खास भेट दिली. या वेळी इमरानने कॅन्सर पीडित मुलांशी गप्पा देखील मारल्या. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात या वस्तूंची खरेदी करावी आणि कॅन्सर पीडित लहान मुलांना मदतीचा हात द्यावा असं आवाहनदेखील त्याने केलं.

Loading Comments