Advertisement

इंटरमिटेंट फास्टिंग करताय? मग, जाणून घ्या 'या' गोष्टी

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? ते करणं किती फायदेशीर आहे? याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेणं देखील आवश्यक आहे.

इंटरमिटेंट फास्टिंग करताय? मग, जाणून घ्या 'या' गोष्टी
SHARES

सध्या व्यायाम, डाएट सोबतच वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting) कडे लोकांचा कल दिसून येत आहे. पण इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? ते करणं किती फायदेशीर आहे? याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? हे जाणून घेणं देखील आवश्यक आहे. आम्ही आज तुम्हाला यासंदर्भातच माहिती देणार आहोत.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे?

इंटमिटेंट फास्टिंग म्हणजे निरोगी जीवनशैलीसाठी दिवसाचे काही ठराविक तास उपाशी राहणं अथवा उपवास करणं. डाएटप्रमाणेच वजन कमी करण्यासाठी हा एक प्रभावी प्रकार सध्या प्रचलित होत आहे. यात दिवसाची काही ठराविक तास तुम्हाला कडक उपवास करावा लागतो. या फास्टिंगची वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता. या प्रकारात तुम्ही काय खाता यापेक्षा कधी खाता याला जास्त महत्व आहे

१६ /८ तासांचे इंटमिटेंट फास्टिंग

या प्रकारानुसार तुम्हाला दिवसभरात सोळा तास उपाशी राहावं लागतं. यात जर तुम्ही सकाळी आठ वाजता नाश्ता केला तर त्यानंतर थेट सायंकाळी चार वाजता काहीतरी खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही पुन्हा सकाळी आठ वाजता नाश्ता करू शकता.

एक दिवस आड इंटरमिटेंट फास्टिंग

या प्रकारात तुम्हाला दररोज उपवास करण्याऐवजी एक दिवस आड उपाशी राहता येतं. तुम्ही ज्या दिवशी उपवास करणार नाही आहात त्या दिवशी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खाता येतात. मात्र उपवासाच्या दिवशी ठराविक वेळेनुसार आणि मर्यादित पदार्थच खावे लागतात.

फायदे काय?

  • वजन झपाट्याने कमी होऊ शकते.
  • बेली फॅट कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग नक्कीच फायद्याचे आहे.
  • ह्रदयाचे आरोग्य राखण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, निरोगी जीवनशैलीसाठी, सुदृढ शरीरासाठी फायदेशीर

'हा' आहार करावा

  • फायबरयुक्त पदार्थ
  • फळं
  • ज्युस
  • काही प्रमाणात कॅलरीयुक्त पदार्थ
  • प्रोटिन्सयुक्त पदार्थ
  • जास्तीत जास्त पाणी

काय काळजी घ्यावी?

  • पहिल्यांदाच इंटरमिटेंट फास्टिंग करणाऱ्यांनी १६ तास उपवास करू नये. याऐवजी १२ तासांसाठी उपवास करण्याचा सल्ला नायला कपाडियानं दिला आहे. आपल्या क्षमतेनुसार वेळ वाढवावी.
  • आपल्याला १२ तास जास्त वाटत असल्यास आपल्या शारीरिक क्षमतेनुसार ८ किंवा १० तासांचे रुटीन फॉलो करावे.
  • उपवास करण्यापूर्वी आणि सोडल्यानंतर एकाच वेळेस जास्त प्रमाणात खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळा.
  • दिवसभरात थोड्या-थोड्या प्रमाणात पौष्टिक आहाराचे सेवन करावं.
  • जंक फूड आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ पूर्णतः वर्ज्य करावेत.
  • इंटरमिटेंट फास्टिंग रुटीनदरम्यान कोणत्याही परिस्थितीत वर्कआउट करणं टाळू नये.

कुणी करू नये

लहान मुलं, वयात येणारे मुलंमुली, वृद्ध मंडळी, गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रीया,आजारी व्यक्ती, रक्तदाबाची समस्या असलेली माणसं यांनी हे मुळीच करू नये. कारण यामुळे त्यांच्या शरीरावर बराच काळ उपाशी राहील्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात.

इंटरमिटेंट फास्टिंग करण्यापूर्वी योग्य डायटीशिअनचा सल्ला अवश्य घ्यावा. त्यानंतर इंटरमिटेंट फास्टिंग करायचं की नाही ठरवावं.



हेही वाचा

दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता - राजेश टोपे

ऑक्टोबरमध्ये ३५ लाख लसीकरणाचं महापालिकेचं लक्ष्य

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा