Advertisement

ऑक्टोबरमध्ये ३५ लाख लसीकरणाचं महापालिकेचं लक्ष्य

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यानुसार, मुंबईसह राज्यभरात लसीकरण केलं जात आहे.

ऑक्टोबरमध्ये ३५ लाख लसीकरणाचं महापालिकेचं लक्ष्य
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यानुसार, मुंबईसह राज्यभरात लसीकरण केलं जात आहे. परिणामी लसीकरण हे मोठ्या प्रमाणात केलं जात असून, आता ऑक्टोबरमध्ये सुमारे ३५ लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य महापालिकेनं ठेवलं आहे.

मुंबईत शाळा, मंदिरे, सिनेमागृह टप्प्याटप्प्यानं सुरू होत असताना लसीकरणाचा वेगही वाढविण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. मुंबईत सप्टेंबरमध्ये सुमारे २९ लाख ५१ हजार लसीकरण झालं असून ऑक्टोबरमध्ये सुमारे ३५ लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य महापालिकेनं ठेवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरात दैनंदिन नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे ४०० ते ५०० दरम्यान असून, रविवारी मात्र एका दिवसात ५७० रुग्णांची नव्यानं भर पडली आहे. सध्या तरी रुग्णसंख्या स्थिर आहे. परंतु, सोमवारपासून शाळा सुरू झालेल्या आहेत, तर येत्या गुरुवारपासून प्रार्थनास्थळेही खुली होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णसंख्या पुन्हा काही अंशी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संक्रमण जास्त वाढू नये म्हणून लसीकरणावर भर देत महापालिकेनं ऑक्टोबरमध्ये सुमारे ३५ लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक लसीकरण झाले असून सुमारे ८९ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली आहे, तर दोन्ही मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण सुमारे ४५ टक्के आहे.

दुसऱ्या मात्राधारकांचे प्रमाण कमी असले तरी वेगाने यांचे लसीकरण करण्यासाठी याही आठवडय़ात दुसऱ्या मात्राधारक आणि महिलांसाठी विशेष लसीकरण आयोजित केले जाणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा