Advertisement

महाराष्ट्राच्या 'या' ८ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण

देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या 'या' ८ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण
SHARES

कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे केंद्र तसंच राज्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचं प्रमाण महाराष्ट्रात अधिक आहे.

देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. तर दिल्ली आणि बंगळुरू अर्बनमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर तसंच देशातील दिल्ली आणि बंगळुरू अर्बन या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

देशात मागील २४ तासात ५६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २७१ जणांचा मृत्यू झाल्यानं प्रशासन खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचा फैलाव आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी सरकारचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

देशात मागील आठवड्यात कोरोना रुग्णवाढीचा दर ५.६५ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात २३ टक्के, पंजाबमध्ये ८.८२ टक्के, छत्तीसगडमध्ये ८ टक्के, मध्य प्रदेशमध्ये ७.८२ टक्के, तामिळनाडुत २.०४ टक्के, कर्नाटकमध्ये २.४५ टक्के, गुजरातमध्ये २.२ टक्के तर दिल्लीत २.०४ टक्के एवढी रुग्णवाढीची टक्केवारी होती.

आतापर्यंत देशात १ लाख ६२ हजार ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात त्यापैकी ५४ हजार २८३, तमिळनाडूमध्ये १२ हजार ६८४, कर्नाटकात १२ हजार ५२०, दिल्लीत ११ हजार ०१२, पश्चिम बंगालमध्ये १० हजार ३२५, उत्तर प्रदेशात ८ हजार ७९०, आंध्र प्रदेशमध्ये ७ हजार २१० आणि पंजाबमध्ये ६ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीला राजेश टोपे देखील उपस्थित होते. एका वृत्तवाहिनीशी या बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, लाॅकडाऊन ही कुणालाच न आवडणारी गोष्ट आहे. परंतु लाॅकडाऊन काही एकाएकी लावला जात नाही. त्यासाठी सर्व परिस्थितीचा सांगोपांग विचार केला जातो. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला जातो. त्या दृष्टीनेच मुख्यमंत्र्यांनी अशा बैठकांच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा केली आहे.

रुग्ण वाढत असताना, त्यांचं प्रमाण काय, आपल्याकडे पुरेशी संसाधने उपलब्ध आहेत काय? पुढच्या काही दिवसांत रुग्णवाढ किती होईल, त्यांना आरोग्य सुविधा, अगदी औषधांपासून ते बेडपर्यंत उपलब्धता आहे की नाही, याचा प्रत्येक टप्प्यावर अभ्यास करावा लागतो.



हेही वाचा

महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन परवडणारं नाही- नवाब मलिक

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी बीमएसीचं धारावीत अनोखं पाऊल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा