Advertisement

मुंबईत १९ वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी

मुंबईत हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील मात्र २४ पैकी १९ वॉर्डांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे.

मुंबईत १९ वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी
SHARES

मुंबईत हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील मात्र २४ पैकी १९ वॉर्डांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. या वॉर्डांमध्ये रुग्णवाढीचा दर ०.९६ ते ०.५१ या दरम्यान नोंदवला गेला आहे. तर, पाच वॉर्डांत रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा अधिक आहे. १९ वॉर्डात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं दिसत आहे. मुंबईच्या ८० टक्के भागातील कोरोना नियंत्रणात आल्याचा दावा मुंबई पालिकेने केला आहे.

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ८७ दिवसांवर पोहोचला आहे. बोरीवली (आर-मध्य), ग्रँट रोड (डी), फोर्ट, चंदनवाडी (सी), वांद्रे पश्चिम (एच पश्चिम) हे परिसर असलेल्या वॉर्डांमध्ये रुग्णवाढीचा वेग थोडा जास्त आहे.

सांताक्रूझ-एच पूर्व, अंधेरी के पूर्व वॉर्डात ०.५६ टक्के आणि कुर्ला-एल वॉर्डात रुग्ण दरवाढीचा दर ०.५१ टक्के आहे. त्याबरोबरीने दादर, धारावी, उत्तर आणि वरळी, प्रभादेवी वॉर्डातील टक्केवारी अनुक्रमे ०.७६ आणि ०.७७ टक्के आहे. भायखळ्यातील ई वॉर्डात हे प्रमाण ०.८१ टक्के असून यापूर्वी वाढत्या संख्येने चर्चेत आलेल्या भांडुप एस वॉर्डमध्ये हे प्रमाण ०.५८ टक्के आहे.

वॉर्डनिहाय रुग्ण दरवाढीची स्थिती 

ग्रँट रोड (डी) – १.४ टक्के

बोरिवली (आर-मध्य) – १.३५ टक्के

चंदनवाडी (सी) – १.१८ टक्के

वांद्रे पश्चिम (एच पश्चिम) – १.११ टक्के

भायखळा – (ई) – ०.८१ टक्के

वरळी, प्रभादेवी (जी दक्षिण) – ०.७७ टक्के

दादर, धारावी (जी उत्तर) – ०.७६ टक्के

भांडुप (एस) – ०.५८ टक्के

अंधेरी (के पूर्व) – ०.५६ टक्के

सांताक्रूझ (एच पूर्व) – ०.५६ टक्के

कुर्ला (एल) – ०.५१ टक्के 



हेही वाचा

'या' १० वॉर्डमध्ये ४६ टक्के कोरोना रुग्ण, पालिका देणार विशेष लक्ष

COVID 19 लसीच्या केईएम रुग्णालय घेणार चाचण्या





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा