Advertisement

नवी मुंबईत आवाजाशी आणि गिळण्याशी संबंधित आजारांवर क्लिनिक सुरू

देशामध्ये गिळण्याशी आणि आवाजाशी संबंधित समस्या वाढत आहेत.

नवी मुंबईत आवाजाशी आणि गिळण्याशी संबंधित आजारांवर क्लिनिक सुरू
SHARES

नवी मुंबईतील एका रुग्णालयाने आवाजाशी आणि गिळण्याशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक सुरू केले आहे. खारघरमधील मेडीकव्हर हॉस्पिटलने ही सुविधा सुरू केली आहे. 

डॉ. नुपूर नेरुरकर यांच्या हस्ते मेडिकोव्हर हॉस्पिटलमधील ओपीडी विभागात पहिल्या मजल्यावर असलेल्या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.

गिळण्याची आणि आवाजाशी संबंधित आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेकांना खात असताना गिळण्यात किंवा श्वास घेण्यासही त्रास जाणवत आहे. या समस्या सर्व वयोगटातील लोकांवर परिणाम करू शकतात. पण हे सर्व आजार ज्येष्ठ नागरिकांमध्ये अधिक आहेत. अशा रुग्णांसाठी हे क्लिनिक वरदान ठरणार आहे. 

“व्होकल कॉर्ड नोड्यूल्स, सिस्ट, पॉलीप, व्होकल कॉर्ड पाल्सी, सल्कस व्होकॅलिस, स्नायू तणाव डिसफोनिया, स्पस्मोडिक डिस्फोनिया, व्होकल कॉर्ड रक्तस्राव, चुकीचे बोलणे आणि गाणे, स्वरयंत्राचा कर्करोग, पोस्ट सर्नोमेक्ट, लॅरिंजल कॅन्सर, व्होकल कॉर्ड, व्हॉईस डिसऑर्डर, स्ट्रोक, अर्धांगवायू, मल्टिपल स्क्लेरोसिस, मायस्थेनिया ग्रॅव्हिस, पार्किन्सन्स रोग, अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस (एएलएस), लॅरिन्जायटिस, लॅरिन्गोफॅरिंजियल रिफ्लक्स डिसीज (एलपीआरडी) हे आजार असलेल्या रुग्णांमध्ये आवाजाशी संबंधित समस्या निर्माण होतात. 

रुग्णांमधील लक्षणे

रूग्णांमध्ये आढळणारी सामान्य लक्षणे म्हणजे कर्कश्शपणा, तीव्र खोकला, थकवा, मोठ्याने बोलता न येणे, आवाज कमी होणे, एकूण आवाजाच्या गुणवत्तेत बदल अशी लक्षणे दिसतात. स्ट्रोकच्या रूग्णांमध्ये डिसफॅगिया सामान्यतः दिसून येतो ज्यामुळे त्यांना गिळणे (संवाद) कठीण होते,” डॉ नवीन के एन, महाव्यवस्थापक आणि केंद्र प्रमुख, मेडिकोव्हर हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले.

डॉ. नवीन के एन पुढे म्हणाले, “गिळण्याशी संबंधित आजारांवर क्लिनिकचा फायदा म्हणजे गिळण्यात अडचणी येणे. हे विशेष क्लिनिक निदान, उपचार उपलब्ध करेल. उपचार पद्धती प्रत्येक रुग्णाच्या  गरजांनुसार तयार केले जातात.”

क्लिनिक अनेक उपचार उपलब्ऑध करेल. आवाज थेरपी, गिळण्याचे मूल्यमापन आणि थेरपी, लॅरेंजियल व्हिडिओ स्ट्रोबोस्कोपी, गिळण्याचे फायबरॉप्टिक एंडोस्कोपिक मूल्यांकन, व्होकल फोल्ड इंजेक्शन  आणि श्वासोच्छवास आणि स्पीच थेरपी अशा अनेक प्रकारे उपचार केली जातील. 

डॉ. फरहा नाझ काझी, आवाज आणि गिळण्याच्या विकारांमधील प्रख्यात तज्ज्ञ, निकिता किरणे आणि रेबेका ग्रेस, त्यांच्या भाषण आणि गिळण्याची थेरपी तज्ञांच्या टीमसह प्रमुख चिकित्सक आहेत.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा