Advertisement

नवी मुंबईत कोरोना लसीकरणात वाढ

नवी मुंबईत १६ जानेवारीपासून शनिवारपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पहिले तीन लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, आता लसीकरणात वाढ झाली.

नवी मुंबईत कोरोना लसीकरणात वाढ
SHARES

नवी मुंबईत १६ जानेवारीपासून शनिवारपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पहिले तीन लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, आता लसीकरणात वाढ झाली. २२ व २३ जानेवारी रोजी शंभर टक्के लसीकरण झालं. त्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने लसीकरणाची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईत आता रोज एक हजार जणांचं लसीकरण करण्यात येणार असून यासाठी दहा केंद्रांवर नियोजन केलं आहे.

शनिवारी १६ जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी ४०० पैकी ३१३ जण लसीकरणास उपस्थित राहिले. मंगळवारी फक्त २३७ जणांनी लसीकरण करून घेतले. तर बुधवारी ३६३ जणांचं लसीकरण झालं. २५ जानेवारीपर्यंत २५०४ जणांचे लसीकरण करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. नवी मुंबईत चार केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावर शंभर असे रोज चारशे जणांचं लसीकरण करण्याचं नियोजन आहे.

 २२ व २३ जानेवारी रोजी १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या आठवडय़ापासून लसीकरणाची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता दहा केंद्रांवर दरदिवशी एक हजार जणांना लस देण्यत येणार आहे.  लसीकरणात करण्यात येणार आहे. 

नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे एकूण २१ हजार २५० लशींच्या कुप्या आल्या आहेत. लसीकरणासाठी नोंदणी झालेल्यांना त्यांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेत होणार आहे, याचा संदेश मोबाइलवर प्राप्त होणार आहे.

लसीकरण केंद्र

अपोलो हॉस्पिटल                 -    ३

 डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय   -     २

वाशी सार्वजनिक रुग्णालय        -    १

ऐरोली सार्वजनिक रुग्णालय       -    २

रिलायन्स हॉस्पिटल               -    २



हेही वाचा -

खासगी रुग्णालयांना महापालिका लसीकरण केंद्रे घोषित करण्याची शक्यता

प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा