Advertisement

मुंबईत साथीच्या आजारांसह मलेरिया, डेंग्युचा धोका वाढला

सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळं मुंबईकर वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत.

मुंबईत साथीच्या आजारांसह मलेरिया, डेंग्युचा धोका वाढला
SHARES

सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळं मुंबईकर वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. काहींना डोकेदुखी, सर्दी, ताप, अंगदुखीसारख्या आजारांना सामोरं जावं लागतं आहे. त्याचप्रमाणं या आजरांसह मलेरीया, डेंग्यू, लेप्टोच्या आजारांचं प्रमाण मुंबईत वाढलं आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत या आजारांमुळं मुंबईमध्ये रुग्णांची संख्या १०० च्या वर गेल्याची माहिती समोर येत आहे.

साथीचे आजार

मुंबईत पावसाळा सुरू झाल्यानंतर आणि पावसाळा संपल्यावर साथीच्या आजारांचा जोर वाढत जातो. अनेकांना मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळं या आजारांमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करणं, घरामध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. मात्र, ही काळजी न घेतल्यानं संबंधित परिसरात रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता जास्त असते. 

स्वाइन फ्लूची लागण

ऑक्टोबरमध्ये मलेरियाच्या २४० तर डेंग्यूच्या १०९ रुग्णांची नोंद मुंबईमध्ये झाली आहे. गॅस्ट्रोचे १७२ रुग्ण आढळले असून ३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिसी समोर येत आहे. त्याशिवाय, सप्टेंबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळं आणि वातावरणातील बदलांमुळं ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्येमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र या कालावधीमध्ये एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

रुग्णांची नोंद सर्वाधिक

चेंबूर, अंधेरी, ग्रॅण्ट रोड, कुर्ला, माटुंगा, जोगेश्वरी या भागामध्ये रुग्णांची नोंद सर्वाधिक असून, मागील वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो या रुग्णांच्या संख्येत यंदा घट झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्यविभागानं दिली आहे. 

आजार 
रुग्णसंख्या
मलेरिया 
२४०
डेंग्यू 
१०९
गॅस्ट्रो 
१७२
हिपेटायटिस 
४५
लेप्टो 
१८
स्वाइन फ्लू 



हेही वाचा -

रेल्वे स्थानक व परिसरातील फेरीवाल्यांविरोधात २२ हजार गुन्हे

भाजपा-शिवसेना राज्यत ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा