रेल्वे स्थानक व परिसरातील फेरीवाल्यांविरोधात २२ हजार गुन्हे


रेल्वे स्थानक व परिसरातील फेरीवाल्यांविरोधात २२ हजार गुन्हे
SHARES

एल्फिन्स्टन (प्रभादेवी) स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर सर्व रेल्वे स्थानकातील आणि स्थाकाबाहेरी परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, अद्याप पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील फेरीवाल्यांचा उच्छाद अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या ९ महिन्यांत फेरीवाल्यांविरोधात केलेल्या कारवाईत २२ हजार गुन्हे दाखल झाल्याचं समजतंकल्याण, ठाणे, दादर, कुर्ला, बोरिवली, अंधेरी, डहाणूत या स्थानकात सर्वाधिक कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई

मागील ९ महिन्यांत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील फेरीवाल्यांच्या विरोधात १० हजार २३२ गुन्ह्यांची नोंद झाली आहेकल्याणमध्ये सर्वाधिक १ हजार ६७३ गुन्हे दाखल झाले आहेत. ठाण्यात ८१३, कुर्ल्यात ४५७ कारवाई करण्यात आली. त्याशिवाय,  पश्चिम रेल्वे मार्गावर १२ हजार १५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. बोरिवलीत १ हजार २०७ गुन्हे, अंधेरीत ७१२, डहाणू रोडअंतर्गत १ हजार ४२४ आणि दादरमध्ये २८४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.


गुन्ह्यांची संख्या

पश्चिम रेल्वे 

वर्ष 
गुन्हे
दंडाची रक्कम 
कारावास
२०१७ 
१२,९०२ 
१ कोटी ८ लाख ४२ हजार ६८० 
१५
२०१८
१२,७६४
८७ लाख १७ हजार ४३०  
११
२०१९ 
१२,०१५
४९ लाख ६२ हजार ९७०
७९

मध्य रेल्वे 

वर्ष
गुन्हे
दंडाची रक्कम 
कारावास
२०१७
२२,६६७
१ कोटी ३४ लाख ३६ हजार २९० 
५८७
२०१८
१२,१९०
१ कोटी १ लाख ७२ हजार ४९०   
२०८
२०१९
१०,२३२
९० लाख ४२ हजार ५४० 
३२हेही वाचा -

भाजपा-शिवसेना राज्यत ताटं वाट्या घेऊन फिरतेय- राज ठाकरे

वर्ल्ड हंगर डे : मुंबईतील या ५ संस्थांना करा अन्नदान आणि व्हा चांगल्या कामाचे भागीदारRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा