Advertisement

पुढच्या महिन्यापासून भारत लस परदेशात निर्यात करणार

यासाठी व्हॅक्सिन मैत्री ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

पुढच्या महिन्यापासून भारत लस परदेशात निर्यात करणार
SHARES

पुढील महिन्यापासून भारत इतर देशांना लसी पुरवायला सुरुवात करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. यासाठी व्हॅक्सिन मैत्री ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी सांगितले की, व्हॅक्सीन मैत्री अंतर्गत ऑक्टोबरपासून पुन्हा पुरवठा सुरू केला जाईल. COVAX कार्यक्रमांतर्गत लसींचा पुरवठा करून भारत वसुधैव कुटुंबकमाचे ध्येय पूर्ण करेल. यामुळे जगाला कोरोनाविरोधात एकत्र लढण्यास मदत होईल.

भारत जगातील इतर देशांना कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे अनेक गरीब आणि गरजू देशातील नागरिकांना लस मिळणं शक्य होणार आहे. भारतात लसींच्या उत्पादनानं वेग घेतला असून बायोलॉजिकल-ई कंपनीच्या लसीदेखील आता बाजारात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत वापरासाठी लसी कमी पडणार नसल्याचं मांडविया यांनी म्हटलं आहे.

कोव्हॅक्स ही संयुक्त राष्ट्रसंघाची संकल्पना असून या अंतर्गत जगातील समृद्ध देशांकडून विकसनशील आणि गरीब राष्ट्रांना लसींचा पुरवठा करण्यात येतो. अनेक देशांना लसी विकत घेणं परवडत नाही. लसी आपल्या देशात तयार करण्याचं तंत्रज्ञानही त्यांना परवडत नाही. अशा देशातील नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांना श्रीमंत देशांकडून लसींचा पुरवठा केला जातो.

यापूर्वीदेखील भारताने इतर देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र त्यावेळी आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे देशात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. आपल्या देशात लसी उपलब्ध नसताना परदेशात लसी निर्यात करण्याच्या मोदी सरकारच्या धोरणावर विरोधकांनी कडाडून टीका केली होती.

भारतात सुरू असलेल्या लसीकरणाच्या महाअभियानात आतापर्यंत ८१ कोटींपेक्षा (India vaccinates more than 81 crore citizens) अधिक लसी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या ११ दिवसांतच यातील १० कोटी लसी दिल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.हेही वाचा

गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्या नागरिकांच्या चाचणीस २६६ केंद्रे

मुंबईतील होम क्वारंटाइन रुग्णांच्या संख्येत वाढ

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा