Advertisement

विमा पॉलीसमध्ये आता कोरोना उपचाराच्या खर्चाचा समावेश

IRDAI नं विमा कंपन्यांना पॉलिसीमध्ये कोरोना व्हायरसचा मेडिकल कव्हर जोडण्याचे आदेश दिले आहेत.

विमा पॉलीसमध्ये आता कोरोना उपचाराच्या खर्चाचा समावेश
SHARES

चीन पाठोपाठ भारतातही कोरोना व्हायरसनं थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा वाढून ७ वर पोहोचला आहे. पुण्यानंतर मुंबईत २ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईकरांसाठी ही बातमी चिंतादायक आहे. चीनमधल्या वुहान इथं कोरोना व्हायरस पसरला. त्यानंतर कोरोना व्हायरसनं दुसऱ्या देशांमध्ये आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत अनेकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे


IRDAI नं दिले आदेश

महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं (IRDAI) नव्या योजना आखण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं (IRDAI) विमा कंपन्यांना पॉलिसीमध्ये कोरोना व्हायरसचा मेडिकल कव्हर जोडण्याचे आदेश दिले आहेत. IRDAI नं कंपन्यांना स्पष्ट केलं आहे की, ज्या विम्यात हॉस्पिटलच्या खर्चाचा समावेश आहे. त्यात कोरोना व्हायरसच्या खर्चाचा समावेश करण्यात यावा.


नवी पॉलिसी आणणार

याआधी IRDAIनं विमा कंपन्यांना कोरोना व्हायरसच्या उपचारासाठीच्या खर्चाचा समावेश असणाऱ्या पॉलिसी आणण्यास सांगितलं होतं. IRDAIनं निर्देश दिले आहेत की, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा खर्च आणि क्वारंटीन पिरियड दरम्यान उपचाराचा खर्च पॉलिसीच्या नियम आणि अटींनुसार सध्याच्या नियामक साच्यात समावेश करावा. तसंच, कोरोना व्हायरसच्या उपचारांशी संबंधित दाव्यांचं त्वरित निराकरण करण्याचे देखील आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत.


उबर देणार भरपाई

आता कॅब सर्व्हिस कंपनी उबरनं घोषणा केली आहे की, चालकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यास त्याला भरपाई देण्यात येणार आहे. उबरच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, जगभरात हे लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहेजे चालक कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे अथवा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना वॉर्डमध्ये ठेवल्याचे कागद दाखवतील, त्यांना १४ दिवसांपर्यंत भरपाई देण्यात येईलआता हा नियम सगळीकडे लागू करण्यात आली नाही. पण लवकरच या नियमाची अमलबजावणी सगळ्या देशांमध्ये होईल.


दुबई ते मुंबई

दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची (Coronavirus update) लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे दाम्पत्य सहलीनिमित्त दुबईला गेले होते. त्यानंतर हे दाम्पत्य ज्या विमानाने दुबईहून मुंबईला उतरले त्या विमानातील सर्व महाराष्ट्रातील प्रवाशांचीही चाचणी करण्यात येत आहे. अशा ४० प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला आहे. सोबतच ज्या टॅक्सीचालकाच्या गाडीत ते बसले होते, त्या टॅक्सी चालकाच्या संपर्कात आलेल्या ७ ते ८ जणांचीही चाचणी करण्यात आली आहे. 



हेही वाचा

धक्कादायक! पुण्यानंतर मुंबईतही कोरोनाचे २ रुग्ण!!

कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे ११ उपाय करा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा