Advertisement

कोरोनाग्रस्तांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड्स

शासकीय रुग्णालयातील आयसोलशन वॉर्ड्समधल्या अस्वच्छतेमुळे कोरोनाचे अनेक रुग्ण रुग्णालयातून पळून गेले होते. त्यामुळे सरकारने तात्काळ खाजगी रुग्णालयांना आयसोलेशन वॉर्ड्स स्थापन करण्यास सांगितले.

कोरोनाग्रस्तांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड्स
SHARES

 शासकीय रुग्णालयातील आयसोलशन वॉर्ड्समधल्या अस्वच्छतेमुळे कोरोनाचे अनेक रुग्ण रुग्णालयातून पळून गेले होते. त्यामुळे सरकारने तात्काळ खाजगी रुग्णालयांना आयसोलेशन वॉर्ड्स स्थापन करण्यास सांगितले. त्यानुसार, मुंबईतील अनेक खाजगी रुग्णालयांनी आयसोलेशन वॉर्ड्स स्थापन केले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असून सरकारी यंत्रणांवर ताण येऊ शकतो यासाठी आता खाजगी रुग्णालयांच्या मदतीने कोरोनाच्या उपचार यंत्रणेला हातभार लागणार आहे.


माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी या सर्व रुग्णालयांची पाहणी केली. या कक्षात नेमणूक करण्यात आलेल्या डॉक्टर्स कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. WHO च्या गाईडलाईन्सनुसार या आयसोलेशन वॉर्ड्समध्ये सर्व नियमावली आणि उपाययोजनांची पूर्तता केली आहे का याचा आढावा घेतला. येत्या काही दिवसांमध्ये कोरोना बधितांच्या वाढत्या संख्येचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारकडून या अतिरिक्त यंत्रणांचा फेरआढावा घेतला जाईल. गरज पडल्यास या आयसोलेशन वॉर्ड्समधील बेड्सची संख्या वाढवली जाईल अशी माहिती डॉ. दीपक सावंत यांनी दिलीय.

 या खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड्स 

एच एन रिलायन्स - 2
जसलोक - 2
नानावटी - 4
बॉम्बे हॉस्पिटल - 4
कोकिळाबेन हॉस्पिटल - 17
फोर्टीस, मुलुंड - 2
रहेजा - 22
हिंदुजा - 16



हेही वाचा- 

जनता कर्फ्यू: राज्यात कोरोनाचे ६४ रूग्ण, मुंबई थांबली, रस्त्यांवर शुकशुकाट

मुंबई लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा