डॉ. तात्याराव लहानेंनी जे.जे. सोडलं, सहसंचालकपदी बढती


SHARE

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाच्या पूर्णवेळ सहसंचालकपदी डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. एस. डी. नानंदकर यांना आता जे. जे. रुग्णालयाचा पदभार देण्यात आला आहे. 

गेली 7 वर्ष डॉ. लहाने यांच्यावर जे.जे. ची संपूर्ण धुरा होती. डॉ. लहाने यापूर्वीही सहसंचालक पदाचा हंगामी कार्यभार सांभाळत होते. पण, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियुक्तीसाठी गुरुवारी अंतिम मंजुरी दिली. याचसोबत डॉ. लहाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयासह सर जे.जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभारही सांभाळणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालय राज्यातील शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व त्यांना संलग्न असलेली रुग्णालये यांचे संचालन व नियंत्रण करते. 

खासगी वैद्यकीय महाविद्यालयावरही या संचलनालयाकडून नियंत्रण केले जाते आहे. आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी सामायिक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे कार्य संचलनालय करते.हेही वाचा

डॉ. लहानेंच्या हातात झाडू


संबंधित विषय
ताज्या बातम्या