Advertisement

कोरोनावरील हे औषध अवघ्या ३९ रुपयात

आता हे औषध इतकं स्वस्त झालं की एक टॅबलेट फक्त ३९ रुपयात उपलब्ध होणार आहे.

कोरोनावरील हे औषध अवघ्या ३९ रुपयात
SHARES

कोरोना रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या औषधांनी उपचार (Coronavirus treatment) केले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फेविपिरावीर (Favipiravir). जपानच्या औषध कंपनीने तयार केलेलं हे औषध भारतातही तयार होऊ लागलं.

भारतातील काही औषध कंपन्यांनी वेगवेगळ्या नावाने हे औषध तयार केलं आहे आणि भारतीयांसाठी स्वस्त किंमतीत उपलब्ध करून दिलं आहे. आता हे औषध इतकं स्वस्त झालं की एक टॅबलेट फक्त ३९ रुपयात उपलब्ध होणार आहे.

जेनबर्ट फार्मास्युटिकल (Jenburkt Pharmaceuticals) कंपनीने फेविवेंट (Favivent) या नावाने फेविपिरावीरचं औषध लाँच केलं आहे. विशेष म्हणजे या औषधाच्या एका टॅबलेटची किंमत फक्त ३९ रुपये आहे. एका पाकिटात १० टॅबलेट असतील, असं कंपनीनं सांगितलं आहे.

याआधी ब्रिन्टॉन औषध कंपनीनं फेविटॉन म्हणून हे औषध लाँच केलं आहे. ज्याची किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये आहे. तर ग्लेनमार्क कंपनीने फॅबिफ्लू म्हणून हे औषध विकत आहे. ज्याची किंमत प्रति टॅबलेट 75 रुपये आहे.

जेनबर्ट कंपनीचे चेअरमन एमडी आशिष यू भुटा यांनी सांगितलं, "भारतात कोरोनाव्हायरससारख्या गंभीर आजाराचं संकट आणि त्यात उद्भवलेली आर्थिक परिस्थिती पाहता समाजाचा एक भाग म्हणून आम्ही औषध कंपन्यांनीही बदलणं गरजेचं आहे. सामाजिक दृष्टीकोनातून समाजहिताचे निर्णय घेणं आवश्यक आहे. फेविवेंटसारखं सहज आणि स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या औषधामुळे भारतीयांना वेळेत आणि आवश्यक असलेले उपचार मिळण्यास मदत होईल, अशी आशा आम्हाला आहे"




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा