Advertisement

कांदिवलीतील जैन मंदिराचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची कमतरता भासत आहेत.

कांदिवलीतील जैन मंदिराचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी खाटांची कमतरता भासत आहेत. त्यामुळं रूग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी कांदिवलीतील जैन मंदिराने पुढाकार घेत मंदिराचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर केलं आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील ५ मजली पावन धाम हे जैन मंदिर पूर्णपणे कोविड सेंटर करण्यात आलं आहे. यात १०० ऑक्सिजन बेड असणार आहेत.

मुंबईत ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. बेड न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. रुग्णांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात बेड मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी जैन मंदिराचे रूपांतर कोविड केंद्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या जैन मंदिरात एक अभ्यास कक्ष, ध्यान कक्ष, स्वयंपाकघर आणि इतर अनेक खोल्या आहेत. येथे बरेच धार्मिक उपक्रम नियमितपणे सुरु असतात. परंतु आता त्याचं पूर्णपणे कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे.

तांत्रिक सेवा जी काही आहे, ती उपलब्ध करण्यात आली असून ही सुविधा एक-दोन दिवसात सुरू होईल. एक्स-रे मशीन आणि इतर वैद्यकीय आपत्कालीन उपकरणे देखील आहेत. शिखर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी येथे सेवा देणार आहेत.

प्रतिदिन ३ हजार रुपये दराने बेड उपलब्ध असतील. या शुल्कामध्ये बेड, ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय उपचार, औषधे, डॉक्टरची फी, भोजन आणि इतर गोष्टींचा समावेश असेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा