मुंबईतील कोरोना रुग्णांची घटती प्रकरणं पाहता, पालिकेनं शहरातील ९ पैकी ६ एकत्रित कोविड केंद्रे बंद करणे अपेक्षित होते. परंतु चीनमध्ये कोरोनानं पुन्हा वेग पकडला आहे. तसंच आयआयटी कानपूरनं देखील जूनमध्ये चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली होती. या शक्यता लक्षात घेऊन राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे पालिका आता अलर्ट मोडमध्ये आली आहे.
पालिकेचे म्हणणे आहे की, शहरात बांधलेले एकही कोविड केंद्र अद्याप बंद झालेले नाही. टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी बोलणी सुरू आहेत. टास्क फोर्स पुढील काही दिवसांत जंबो कोविड सेंटर बंद करायचे की नाही यावर विचार करेल आणि निर्णय घेईल.
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी जम्बो कोविड सेंटर्स बंद करण्याचा निर्णय फेटाळताना सांगितलं की, "मुंबईतील कोरोनाविरुद्धच्या लढाईत जम्बो कोविड सेंटरचे मोठे योगदान आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. पण आम्ही शक्यता नाकारत नाही. चौथ्या लाटेची, त्यामुळे सध्या आमच्याकडे ९ पैकी ३ कोविड केंद्र चालू आहेत, उर्वरित ६ जंबो केंद्रे स्टँडबाय मोडवर आहेत, स्टँडबाय मोड बंद करणे चुकीचे ठरेल"
राज्य सरकारनं नुकतेच राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले आहेत. मुंबईत मास्कशिवाय फिरण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. सध्या मुंबईत मास्कशिवाय प्रवास करण्यासाठी कोणताही दंड नाही. कोविड-19 महामारी अद्याप संपलेली नसल्यामुळे पालिकेनं लोकांना स्वेच्छेनं मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा