Advertisement

नवी मुंबईत १२-१४ वयोगटातील ६९ मुलांचे लसीकरण पूर्ण

यापूर्वी, महाराष्ट्र सरकारनं १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली होती.

नवी मुंबईत १२-१४ वयोगटातील ६९ मुलांचे लसीकरण पूर्ण
SHARES

नवी मुंबईकरांसाठी एक स्वागतार्ह बातमी आहे. १२-१४ वयोगटातील सुमारे ६९ टक्के मुलांना पहिल्या डोससह कोविड-19 विरुद्ध लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) उघड केली आहे.

NMMC ने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, शहरातील या वयोगटातील एकूण ४७,४५९ मुलांनी लसीकरण केलं आहे आणि त्यापैकी ३२,८०४ किंवा ६९ टक्के मुलांना लसीकरण करण्यात आले आहे.

NMMC ही राज्यातील पहिली नागरी संस्था आहे जिनं १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे १०० टक्के लक्ष्य गाठले आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण १६ मार्च रोजी सुरू झाले परंतु लसीकरण मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

१२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण वाशी, नेरूळ आणि ऐरोली महानगरपालिकेच्या रुग्णालयात केले जात आहे. या वयोगटासाठी १६ मार्च रोजी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. यापूर्वी, महाराष्ट्र सरकारनं १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली होती.

याशिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नं देखील गेल्या आठवड्यात म्हटलं की १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फ्कत १००० डोस आवश्यक आहेत. अधिका-यांनी असंही सांगितलं की, या आठवड्यात हा टप्पा पार केला जाऊ शकतो.



हेही वाचा

मुंबईकरांसाठी खूशखबर, मेट्रो ७ सह २अ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च सरकार उचलणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा