Advertisement

कोल्हापूरच्या विजयाने घेतलं मुंबई दर्शन


कोल्हापूरच्या विजयाने घेतलं मुंबई दर्शन
SHARES

कोल्हापूरहून उपचारांसाठी मुंबईत आलेल्या विजया चौगुलेला बुधवारी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी विजयाला मुंबईचं दर्शन घडवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, विजयाने आपल्या आई-वडिलांसोबत मुंबईची सैर केली. त्यामुळे ती खूपच खूष होती.


मी पहिल्यांदाच मुंबईत आले आहे. मी मुंबई कधीच पाहिली नव्हती. मरीन ड्राइव्ह आणि गेट वे ऑफ इंडिया बघून‌ मला खूप आनंद झाला.

- विजया चौगुले, विद्यार्थिनी

'विजयाला आनंदित बघून तिच्या आई-वडिलांनाही खूप आनंद झाला. विजया आता पूर्णपणे बरी झाली आहे, हे बघून‌ आम्हाला खूप बरं वाटतंय. मुंबईत येऊन फिरायला मिळाल्यानं तिला फार बरं वाटत‌ असल्याची' प्रतिक्रिया विजयाचे वडिल निवृत्ती चौगुले यांनी दिली.

गुरुवारी विजया मत्सालय, नेहरू तारांगण आणि जिजामाता उद्यानातील पेंग्विन पाहून कोल्हापुरला परतणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा