'निरोगी आयुष्यासाठी तणावमुक्त राहा'

 Sewri
'निरोगी आयुष्यासाठी तणावमुक्त राहा'
'निरोगी आयुष्यासाठी तणावमुक्त राहा'
'निरोगी आयुष्यासाठी तणावमुक्त राहा'
See all

शिवडी - बचत गटातील महिलांसाठी शिवाजीनगर, प्रभाग 197 च्या उप-शाखाप्रमुख मीरा निंबाळकर यांनी अॅमवे कंपनीच्या सहकार्यानं मंगळवारी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिला अनेक कौटुंबीक तसंच व्यावसायिक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यातून त्यांना कळत न कळत मानसिक तणावाला सामोरं जावं लागतं. परिणामी आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळं महिलांनी सुखी आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी तणावमुक्त असणं गरजेचं आहे, असा सल्ला डॉ. दीपाली सुर्वे यांनी दिला. अॅमवे कंपनीच्या उत्पादनांबाबतही या वेळी महिलांना माहिती देण्यात आली.

Loading Comments