Advertisement

महाराष्ट्राला दरमहा ३ कोटी लस डोस द्या, विधानसभेत ठराव

राज्यात डेल्टा प्लस रुग्ण व म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. या सर्वाला आळा घालण्यासाठी व संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे.

महाराष्ट्राला दरमहा ३ कोटी लस डोस द्या, विधानसभेत ठराव
SHARES

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. दिवसाला 15 लाख लसीकरण करण्याची क्षमता राज्याची आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक महिन्याला किमान 3 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव विधान परिषद व विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा ठराव मांडला.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात डेल्टा प्लस रुग्ण व म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. या सर्वाला आळा घालण्यासाठी व संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. मोठय़ा प्रमाणावरील लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. राज्यात 26 जून 2021 रोजी एका दिवसात 7 लाख 38 हजार 704 लोकांचे लसीकरण केले असून 3 जुलै 2021 रोजी एका दिवसात 8 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे. 

राज्याची दररोजची लसीकरणाची क्षमता 15 लाखांची असून केंद्र सरकारने प्रत्येक महिन्यास किमान 3 कोटी लसीचे डोस राज्यास उपलब्ध करून दिल्यास राज्याचे लसीकरण लवकर पूर्ण करता येईल. लसीकरण लवकर पूर्ण झाल्यास सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल, कोरोनाची तीव्रताही कमी होईल. आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होईल, असे टोपे म्हणाले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा