राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईतून १६ तर पुण्यातून कोरोनाचे २ नवे रुग्ण समोर आले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३२० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. अवघ्या १२ तासांमध्ये मुंबईमध्ये १६ नवे रुग्ण समोर आले आहेत.
एकीकडे कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यातील सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. पण तरीदेखील मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मंगळवारी २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ७२ कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण आढळले होते. त्यात अवघ्या १२ तासांमध्ये आणखी १६ रुग्णांची वाढ झाली आहे.
मुंबईत मंगळवारी ५९ रुग्ण आढळले होते. एका दिवसातली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. मुंबईतले ५९ रुग्ण तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी, विरार इथं प्रत्येकी २ रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा ७२ नं वाढला होता.
हेही वाचा