Advertisement

महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील ही ठिकाणं सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील
SHARES

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी करोनाचे रूग्ण सापडले आहेत ते सर्व परिसर महापालिकेकडून सील करण्यात आले आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील १४६ ठिकाणं सील करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या मदतीनं बॅरिकेंटींग करून हे परिसर सील करण्यात आले आहेत. तसंच या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची खबरदारी ही पालिकेतर्फे घेण्यात आली आहे.

दक्षिण मुंबईतील ४८ जागा असून, यामध्ये मलबार हिल्स, वाळकेश्वर, पोद्दार रोड, बेलासिस रोड, वरळी कोळीवाडा आणि प्रभादेवीसारख्या परिसरांचा समावेश आहे. वरळी कोळीवाडा परिसरातील करोनाग्रस्तांच्या संख्येत मंगळवारी वाढ होऊन ती १० वर पोहोचली. अन्य दोन संशयितांची करोनाची चाचणी करण्यात आल्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. तसंच, प्रभादेवी येथील एका चाळीतही १३ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. या ठिकाणी खानावळ चालवणाऱ्या एका महिलेला करोनाची लागण झाल्याचं २४ मार्च रोजी निष्पन्न झालं होतं.

मुंबईतील पश्चिम भागातील ४६ ठिकाणं सील करण्यात आली आहेत. यामध्ये वांद्रे पश्चिम आणि खास या ठिकाणांचा प्रामुख्यानं समावेश आहे. या ठिकाणांमध्ये हिल रोड, एसव्ही रोड, वांद्रे गव्हरमेंट कॉलनी, बिंबिसार नगर यांचा समावेश आहे. सोमवारी बिंबिसारनगर मधील इंग्लंडमधून आलेली एक महिला पॉझिटिव्ह सापडली होती. त्यानंतर हा भागही सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वेकडील ४८ ठिकाणं देखील महापालिकेनं सील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्यानं चेंबूर आणि घाटकोपमधील ३५ ठिकाणांचा समावेश आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात दररोज आणि इतर सार्वजनिक रुग्णालये, दवाखाने, हेल्थ पोस्ट, विभाग कार्यालयांचे आठवड्यातून एकदा निर्जुंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हेही वाचा -

८९२ रेल्वे डब्यांचे वॉर्डमध्ये रूपांतर

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर 'टिकटॉक' केल्याप्रकरणी तक्रारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा