Advertisement

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने दिल्या ५ कोटी लसीचे डोस

राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने दिल्या ५ कोटी लसीचे डोस
SHARES

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सोमवारी सायंकाळी सहापर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

१४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली.

सोमवारी दिवसभरात राज्यात ५ हजार ८११ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार १४५ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय, राज्यात आज १०० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

हेही वाचा- लोकल, मॉल सुरू; वाचा काय बंद? काय सुरू?

राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८६ टक्के एवढे झाले आहे.  आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,९६,८०५ झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत एकूण १३५१३९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,५३० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६२,४५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा