Advertisement

गार्डन आणि चौपाट्यांबद्दल पालिकेचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्रवेशाची योग्य वेळ

मॉल, मुंबई लोकल आणि दुकानांच्या वेळा वाढवून दिल्यानंतर चौपाट्या, उद्यानांबाबत मुंबई महानगर पालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे.

गार्डन आणि चौपाट्यांबद्दल पालिकेचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्रवेशाची योग्य वेळ
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत (Mumbai Coronavirus) घट होत असताना मुंबई महानगरपालिकेनं अनेक निर्बंध शिथिल (Mumbai Guidline) केले आहेत. मॉल, मुंबई लोकल आणि दुकानांच्या वेळा वाढवून दिल्यानंतर चौपाट्या, उद्यानांबाबत मुंबई महानगर पालिकेनं (BMC) मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हे दिलासादायक आहे. 

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या व समुद्रकिनारे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच, सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर बंधनकारक आहे, असंही या आदेशात नमूद केलं आहे. या सर्व ठिकाणी भेट देताना कोरोनाच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं त्या लोकांना परवानगी दिली होती ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत. राज्य सरकारनं दुकानं आणि हॉटेल्स खुली ठेवण्याची वेळ वाढवली आहे.


हेही वाचा : 

महापालिकेच्या घरोघरी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद


१५ ऑगस्टपासून हॉटेल(Hotels), रेस्टॉरंट (Resturents) सुरू ठेवण्यात रात्री १० पर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या (Vaccination Drive) दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले असले पाहिजे, असं राज्य सरकारनं आदेशात नमूद केलं आहे.

कोरोनाची पहिली लाट (कोविड १९) असो किंवा दुसरी लाट, पालिकेनं लॉकडाऊनमध्ये ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, त्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) अनेक देशांनी कौतुक केलं. एवढंच नाही तर पालिका ज्याप्रकारे लसीकरण मोहीम सुरळीत चालवून मुंबईकरांना लसीकरण करत आहे हे देखील एक उत्तम उदाहरण आहे. यासंदर्भात, मुंबई उच्च न्यायालयानं (High Court) पालिकेचे लसीकरण मॉडेल यशस्वी असल्याचंही नमूद केलं आहे आणि म्हटलं आहे की, इतर स्थानिक संस्थांनीही हे मॉडेल स्वीकारलं पाहिजे.

पालिकेचे कौतुक करताना मुंबई उच्च न्यायालयानं म्हटले आहे की, पालिका लसीकरण मोहिमेद्वारे योग्य दिशेनं जात आहे. जे लसीकरण केंद्रांवर जाण्यास असमर्थ आहेत त्यांना घरोघरी जाऊन ही लस देत आहे, ती देखील योग्य दिशेने वाटचाल करत आहे. न्यायालयानं पुढे म्हटलं आहे की, पालिकेचे हे मॉडेल इतर महानगरपालिकांनीही स्वीकारलं पाहिजे आणि लागू केलं पाहिजे.



हेही वाचा

मुंबईत होणार ४९० नवीन रस्ते; महापालिकेचे रस्ते बांधणीचे नियोजन

डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याचा दावा करणारे राजकारणी थापाडे- सायरस पूनावाला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा