Advertisement

महापालिकेच्या घरोघरी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद


महापालिकेच्या घरोघरी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद
SHARES

अनेक रुग्ण, वयोवृद्ध तसेच अपंग निराधार व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य नाही. ही गरज लक्षात घेऊन महापालिकेने घरोघरी लसीकरणाची सुरवात केली. या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद वाढता असून आतापर्यंत २ हजार व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण करण्यात आले आहे. त्याशिवाय, कोणतीही कागदपत्रे नसलेल्या एक हजार ७६१ जणांचे शनिवारी संध्याकाळपर्यंत लसीकरण करण्यात आले आहे.

कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी ही मोहीम महापालिका प्रशासनाने राबवली आहे. त्याचा अधिकाधिक गरजूंनी लाभ घ्यावा. घरात एकाकी, आजारी स्थितीमध्ये असलेल्या अनेकांना लशीबाबत माहितीच नाही. लसीकरणाचा वेग न वाढल्यामुळेही अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पुरेशा लसमात्रा उपलब्ध असतील, तरच या मोहिमेला गती येईल.

शनिवारी संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये ५ हजार ५२२ स्तनदा मातांचे लसीकरण करण्यात आले. लस घेतल्यानंतर त्रास होत नाही, कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण गरजेचे आहे, हे पटल्यानंतर लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद वाढत असल्याचे समजतं. मात्र गर्भवतींमध्ये लसीकरण करून घेणाऱ्यांची संख्या वाढलेली नाही. मुंबईत ५७४ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे.

व्यंग असलेल्या व्यक्तींपैकी १ हजार ९७३ जणांनी लस घेतली आहे. प्रत्यक्ष केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी या व्यक्तींना खूप त्रास होतो, त्यामुळे सोसायट्यांच्या परिसरामध्ये लसीकरण प्रक्रिया राबवणे लाभदायक ठरेल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा