Advertisement

दोन लस घेण्यात महाराष्ट्र प्रथम स्थानावर

कोरोना लसीकरणात उत्तर प्रदेशनं आघाडी घेतली असली तरी लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात सर्वप्रथम आहे.

दोन लस घेण्यात महाराष्ट्र प्रथम स्थानावर
SHARES

कोरोना लसीकरणात उत्तर प्रदेशनं आघाडी घेतली असली तरी लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात सर्वप्रथम आहे. उत्तर प्रदेशनं आतापर्यंत पाच कोटी ५० लाख ४८ हजार इतके लसीकरण केलं आहे. तर दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ८६ लाख १८ हजार इतकी आहे.

तर महाराष्ट्र लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर असून आतापर्यंत चार कोटी ७५ लाख इतके लसीकरण झाले आहे. मात्र दोन्ही मात्रा देण्यात महाराष्ट्र सर्वप्रथम असून एक कोटी २२ लाख नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.

राज्यात दिवसभरात ५ हजार ५६० नव्या करोना रुग्णांची तर १६३ मृत्यूंची नोंद झाली. दिवसभरात ६ हजार ९४४ जण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६४ हजार ५७० इतकी आहे.

चोवीस तासांत मुंबईत २८५, रायगडमध्ये १३९, अहमदनगरात ८११, पुणे जिल्ह्यात ६६७, पुणे शहरात २८३, पिंपरी-चिंचवडमध्ये १९६, सोलापूरमध्ये ५९६, साताऱ्यात ५९४, कोल्हापूरमध्ये २७३, सांगलीत ४७४, रत्नागिरीत १५५, उस्मानाबादमध्ये १०१, बीडमध्ये ११३ इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली.

दरम्यान एका बाजूला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचं मिरवलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला अपुऱ्या लसींअभावी लसीकरण मोहिमेला वारंवार खिळ बसत असल्याचंही पुढं येत आहे.

१ ऑगस्ट ते १० ऑगस्टपर्यंत राज्यातील लसीकरणात ३० टक्के घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाची तिसरी लाट उंठरठ्यावर आलेली असताना लसीकरणातील संथगती धोक्याची ठरण्याची शक्यता आहे.

जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणानं चांगलाच वेग धरला होता. कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी कोरोना प्रतिबंध नियमांचं काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर ज्या देशांमध्ये लसीकरण जास्त झाले तिथं तिसरी लाट आली तरी तिचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून अखंडितपणे लस पुरवठ्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.



हेही वाचा

आॅक्सिजनवरील कोविड रुग्णसंख्या ३० हजारांवर गेल्यास पुन्हा कडक निर्बंध!

राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण आढळले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा