Advertisement

शासकीय रूग्णालयात मिळणार शिशु स्वागत कीट

नवजात बाळांची स्वच्छता राखण्याबरोबरच नवजात बाळांना योग्यप्रकारे सांभाळ्यास मदत होईल यादृष्टीनं नवजात बालकांना मोफत शिशु स्वागत किट देण्याचा निर्णय घेत एक योजना राज्य सरकारनं सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिशु स्वागत कीट असा या योजनेचं नाव असून या योजनेचा शुभारंभ मंगळवारी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

शासकीय रूग्णालयात मिळणार शिशु स्वागत कीट
SHARES

कुपोषण, अतिसार, संसर्गजन्य आजार, कमी वजनामुळे होणाऱ्या बालमृत्यूचं प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढतच चाललं आहे. त्यामुळे बालमृत्यू रोखण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर उभं ठाकलं आहे. हे आव्हान पेलत बालमृत्यू रोखण्यासाठी आता महिला व बालकल्याण मंत्रालय पुढं आलं आहे. नवजात बाळांची स्वच्छता राखण्याबरोबरच नवजात बाळांना योग्यप्रकारे सांभाळ्यास मदत होईल यादृष्टीनं नवजात बालकांना मोफत शिशु स्वागत किट देण्याचा निर्णय घेत एक योजना राज्य सरकारनं सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिशु स्वागत कीट असा या योजनेचं नाव असून या योजनेचा शुभारंभ मंगळवारी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.


शिशु स्वागत किट

या योजनेद्वारे महिलेच्या पहिल्या प्रसुतीदरम्यान मुलाच्या संगोपनासाठी राज्य शासनातर्फे शिशु स्वागत किट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विविध शासकीय रूग्णालयात प्रजासत्ताक दिनापासून ही योजना राबवण्यास सुरूवात झाली असून या कीटमध्ये नवजात बालकाला लागणारे हातमोजे, ब्लॅकेट, लंगोट, कपडे यांसह विविध साहित्य उपलब्ध असणार आहे.


असे असेल हे कीट

नवजात बालकाला देणाऱ्या येणाऱ्या या शिशु कीटमधील वस्तूंची जवळपास किंमत २ हजार इतकी असून त्यात लहान मुलांसह आईसाठी काही वस्तू देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय हे सर्व कीट ठेवण्यासाठी एक लहान बॅगही देण्यात येणार आहे.

  • लहान मुलांसाठी कपडे
  • प्लास्टिक लंगोट,
  • झोपण्यासाठी लहान चटई व गादी
  • लहान टॉवेल
  • मुलांना अंगाला लावायचं तेल
  • मच्छरदाणी
  • गरम ब्लॅंकेट
  • लहान मुलांचा शॅम्पू
  • लहान नेलकटर
  • मुलांसाठी हातमोजे व पायमोजे
  • मुलाला गुंडाळून ठेवण्यासाठी कापड
  • खेळणी, खुळखुळा
  • बॉडी वॉश लिक्वीड
  • आईसाठी हात धुण्याचं लिक्विड
  • आईसाठी लोकरीचे कपडे

बालमृत्यू कमी करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प आणि आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी भागात बऱ्याच वेळा नवजात बालकाला सारवलेल्या जमिनीवर ठेवले जाते. अशा वेळी जमिनीतील थंडाव्यामुळे बाळ आजारी पडते. त्यामुळे बालकांची काळजी कशी घ्यावी याबाबत अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत मातांना शिक्षण दिले जात आहे. पण त्याचबरोबर बाळाला उब मिळेल, त्याची स्वच्छता राखली जाऊ शकेल यासाठी अशा प्रकारच्या साहित्याची कीट नवजात बालकांना शासनामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं मत योजनेच्या शुभारंभादरम्यान महिला व बालविकास मंत्री पंकजा मुडे यांनी व्यक्त केलं.

यानुसार आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या ठिकाणी ही योजना सुरू झाली असून बालमृत्यू कमी करण्यत यश आलं आहे. या कीटमधील वस्तूंची निवडही आरोग्य विभागाच्या आणि विशेषतज्ज्ञांच्या सल्ल्यानं करण्यात आली असून या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २० कोटी रूपयांची उपलब्धता करण्यात आली आहे. हे कीट आदिवासी, ग्रामीण आणि बालमृत्यूचे प्रमाण अधिक असलेल्या भागामध्ये पुरवण्यात येणार असून ही योजना शहरी भागातही लागू करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

लवकरच सार्वजनिक शौचालयांमध्येही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

सर्दी-खोकल्याची औषधं आता मेडीकल स्टोअर्सव्यतिरिक्त 'इथं'ही मिळणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा