Advertisement

लवकरच सार्वजनिक शौचालयांमध्येही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन

झोपडपट्ट्यांमधील महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीनं मुंबई महानगर पालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार झोपडपट्टी परिसरातील २३५ सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत.

लवकरच सार्वजनिक शौचालयांमध्येही सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन
SHARES

झोपडपट्ट्यांमधील महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीनं मुंबई महानगर पालिकेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार झोपडपट्टी परिसरातील २३५ सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. तर यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. तिथं हा प्रस्ताव मंजुर झाल्यास १ कोटी ७१ लाख ७२ हजार ६२९ रुपये खर्च करत झोपडपट्ट्यांमधील २३५ सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन बसवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


जंतुसंसर्ग वाढण्याची भिती

शाळा-महाविद्यालय, तुरूंग, पोलिस ठाणे, रूग्णालय अशा विविध ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आणि इनसिनरेटर मशीन बसवण्यात आली आहेत.  या मशीनमुळे सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध होत असून नॅपकिनची विल्हेवाट लावणंही सोप होऊ लागलं आहे. दरम्यान मुंबई महानगर पालिकेकडून पालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून दिल्यानंतर आता पालिकेनं आपला मोर्चा झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांकडे वळवला आहे. झोपडपट्टयांमध्ये प्रत्येक घरात शौचालय नसतं. ते बांधणंही शक्य नसतं. अशावेळी सार्वजनिक शौचालयांचा वापर इथं केला जातो. पण सार्वजनिक शौचालयामध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीची कोणतीही सोय नसते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन कचऱ्यात वा शौचालयातच कुठं तरी टाकली जातात. बऱ्याचदा नाल्यात, गटारात वा शौचकुपातही सॅनिटरी नॅपकिन टाकली जातात. त्यामुळे जंतुसंसर्ग वाढण्याची भिती वाढते आणि त्याबरोबरच शौचकुप वाहिन्या, गटार, नाले तुंबतात. महत्त्वाचं म्हणजे झोपडपट्टयांमधील गरीब महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत नसल्यानं त्यांच्याकडून कपड्याचाच वापर होतो. त्यामुळे अशा महिलांना जंतुसंसर्ग वा इतर आजार होण्याची शक्यता असते.


सार्वजनिक शौचालयात सॅनिटरी नॅपकिन मशीन आणि इनसिनरेटर मशीन

या सर्व बाबी लक्षात घेत, झोपडपट्ट्यांमधील महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याबरोबरच सॅनिटरी नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेनं सार्वजनिक शौचालयात सॅनिटरी नॅपकिन मशीन आणि इनसिनरेटर मशीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत विविध ठिकाणी पालिकेची ६५२ सार्वजनिक शौचालये आहेत. यातील २३५ सार्वजनिक शौचालयांमध्ये पहिल्या टप्प्यात सॅनिटरी नॅपकिन मशीन आणि इनसिनरेटर मशीन बसवण्यात येणार आहेत. 



हेही वाचा -

सर्दी-खोकल्याची औषधं आता मेडीकल स्टोअर्सव्यतिरिक्त 'इथं'ही मिळणार

लोकार्पणानंतर अवघ्या दोन दिवसांत फ्लोरा फाऊंटन बंद



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा