Advertisement

कारखान्यांच्या ठिकाणीच उभारणार हाॅस्पीटल्स, आॅक्सिजन तुटवड्यावर सरकारची नवी शक्कल

राज्यात अशीही काही ठिकाणं आहेत, जिथं आॅक्सिजनचं उत्पादन होतं. परंतु तिथून आॅक्सिजन वाहून नेण्याची सुविधा नाही.

कारखान्यांच्या ठिकाणीच उभारणार हाॅस्पीटल्स, आॅक्सिजन तुटवड्यावर सरकारची नवी शक्कल
SHARES

राज्यातल्या रुग्णालयांमधील आॅक्सिजन तुटवड्याने उग्र रूप धारण केलं आहे. आॅक्सिजनअभावी कोरोनाबाधितांना जीवाला मुकावं लागत आहे. राज्य सरकारचे आॅक्सिजन मिळवण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्नही सुरूच आहे. त्यातच राज्यात असेही काही कारखाने आहेत, ज्या ठिकाणी आॅक्सिजनचं उत्पादन होतं. परंतु तिथून आॅक्सिजन वाहून नेण्याची सुविधा नाही. त्यामुळे या कारखाना परिसरातच तात्पुरती फिल्ड हाॅस्पीटल्स बांधून बेड्सची संख्या वाढवण्यावर आता राज्य सरकारने विचार सुरू केला आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) म्हणाले की, राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते असा अंदाज आहे. राज्यात सध्या १२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित असून तो पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. त्याशिवाय जामनगर, भिलाई आणि भिल्लारी इथून सुमारे ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात अजून वाढ करून ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा- पंतप्रधान म्हणाले लाॅकडाऊन शेवटचा पर्याय, पण महाराष्ट्रात सध्या त्याचीच गरज- राजेश टोपे

राज्यात अशा पद्धतीने एकूण १५५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचं वाटप केलं जात आहे. केंद्र शासनदेखील सुमारे ५० हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करणार असून त्या माध्यमातूनही राज्याला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तविली आहे.

महाराष्ट्रात (maharashtra) ६ ठिकाणं अशी आहेत जिथं ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातं. मात्र त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे या ६ ठिकाणी ५०० बेडची सुविधा असलेलं तात्पुरतं रुग्णालय बांधता येईल का याबाबत निर्णय घेण्यात येत आहेत.

पेण (जेएसडब्ल्यू), थळ (आर सी एफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा ६ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून त्याची शुद्धता ९८ टक्के असून रुग्णाला देता येऊ शकतो. त्यामुळे या ६ ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचं रुग्णालय निर्माण करून रुग्णांना ऑक्सिजन देण्याचं नियोजन आहे. त्याची निर्मिती झाल्यावर राज्यात सुमारे ३००० खाटांची भर पडणार असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

(maharashtra government to build covid 19 hospitals near by oxygen plant says rajesh tope)

हेही वाचा- शिवडी रुग्णालयातील डॉक्टरचा कोरोनामुळे मत्यू, शेवटची पोस्ट मन हेलावणारी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा