Advertisement

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढण्याचं 'हे' आहे कारण

देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढतच आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढण्याचं 'हे' आहे कारण
SHARES

देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत.  राज्यात सर्वाधिक रुग्ण सापडत असल्यामुळे चिंता वाढत आहे. मात्र, राज्यात अधिक रुग्ण असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोनाच्या चाचण्या. राज्यात देशाच्या तुलनेत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे साहजिकच रुग्णांचा आकडा वाढत आहे. 

कोरोना चाचण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आयसीएमआरने (Indian Council of Medical Research) जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या चाचण्या करणं गरजेचं असतं. कारण अनेक कोरोनाबाधित रुग्णांना या रोगाची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे असे रुग्ण समोर न आल्यास त्यांच्यामुळे इतरांना बाधा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने कोरोनाच्या चाचण्या वाढवल्या असून आता 

महाराष्ट्रात 19 एप्रिलपर्यंत 72 हजार 23 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातले 66 हजार 673 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्या तुलनेत इतर राज्यांमध्ये चाचण्यांची संख्या कमी आहे. चाचण्यांमध्ये राजस्थान, गुजरात तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. रँपिड टेस्टिंगचं घोषणा करणारं दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. तर सहावा क्रमांक केरळचा आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट अशा तीन ‘टी’ चा फॉर्म्युला जागतिक पातळीवर सांगितला जातो. जेवढ्या लवकर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होतील तेवढ्या लवकर त्याचा प्रसार रोखता येणार आहे.

कोरोना चाचण्यांची आकडेवारी 

राजस्थान     -   42718

गुजरात         -  30783

तामिळनाडू    -  29178

उत्तर प्रदेश   -  26829

केरळ           -  22, 000

दिल्ली         -  20, 000



हेही वाचा -

पालघरमध्ये चोर समजून तिघांची दगडानं ठेचून हत्या

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२०० वर




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा