Advertisement

मुंबईतील कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबद्दल राजेश टोपे म्हणाले...

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

मुंबईतील कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबद्दल राजेश टोपे म्हणाले...
SHARES

कोरोनाचा एक्सआर व्हेरिएंट (XR variant of Corona) मुंबईत आढळून आल्याची माहिती पालिकेनं बुधवारी दिली होती. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.  

'मुंबई महापालिकेच्या वतीनं जरी कोरोनाचा एक्सआर आणि कापी व्हेरियंट असल्याचं सांगितलं आहे. परंतु याबाबत पुष्टी झालेली नाही परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही' अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि नव्या सापडलेल्या व्हेरिएंटबद्दल माहिती दिली.

'मुंबई महापालिकेच्या वतीनं जरी कोरोनाचा एक्सआर आणि कापी व्हेरियंट असल्याचं सांगितलं आहे. परंतु याबाबत पुष्टी झालेली नाही. एनआयबीकडे देखील टेस्टिंग करण्यात येणार आहे. या नव्या व्हेरियंट बाबत दाहकता धोका किती हे अजून स्पष्ट झालेले नाही. कस्तुरबा रूग्णालय आणि एनआयबीकडून जिनोम सिक्वेंगिं रिपोर्टर सादर करण्यात येणार आहेत परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, पालिकेनं केलेला हा दावा केंद्रानं फेटाळून लावला आहे. अधिक तपासासाठी त्याचे जनुकीय चाचण्यांचे अहवाल पाठविण्याचे आदेश कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेला दिले.

जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांचा अभ्यास करणारी इंडियन सार्स-सीओव्ही२ जिनोमिक्स कन्सॉर्रिटयम (आयएनएसएसीओजी) या संस्थेतील तज्ज्ञांच्या मते या रुग्णाचे जिनोम चाचणीचा अहवाल एक्सईच्या जिनोमनुसार नाहीत. त्यामुळे या रुग्णाला एक्सई या उपप्रकाराची बाधा झाली आहे, असे म्हणता येणार नाही.

‘आयएनएसएसीओजी’ची संध्याकाळी बैठक झाली असून, यामध्ये कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री सहभागी झाल्या होत्या. कस्तुरबा प्रयोगशाळेतील अहवालांचे विश्लेषण करण्यासाठी नमुने पुन्हा पाठवण्याची मागणी या बैठकीत केली आहे.



हेही वाचा

चिंतादायक! मुंबईत आढळले कोरोनाच्या २ नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

नवी मुंबईत १२-१४ वयोगटातील ६९ मुलांचे लसीकरण पूर्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा