Advertisement

चिंतादायक! मुंबईत आढळले कोरोनाच्या २ नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

राज्य सरकारसोबतच पालिकेच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे.

चिंतादायक! मुंबईत आढळले कोरोनाच्या २ नव्या व्हेरिएंटचे रुग्ण
SHARES

मुंबईत दोन नवे व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचं नाव एक्सई आणि कापा  असं आहे. त्यामुळे राज्य सरकारसोबतच पालिकेच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे.

नुकतंच राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. यासोबतच मास्क देखील एच्छिक करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट सापडल्यानं प्रशासनाच्या चिंतेत नक्कीच भर पडू शकते.

नवीन कोविड प्रकार XE चे एक प्रकरण आज मुंबईत आढळून आले. चाचणी केलेल्या ३७६ नमुन्यांपैकी एक XE प्रकारासाठी सकारात्मक आला.

कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) अंतर्गत अकराव्या चाचणीमध्ये दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत ९९ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

मुंबईत एकूण २३० नमुन्यांमध्ये ‘ओमायक्रॉन’चे २२८ रुग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण ‘कापा’ उपप्रकारानं तर अन्य एक जण ‘एक्सई’ उपप्रकारानं बाधित असल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयात दाखल २१ पैकी कोणालाही प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता उपचारांची गरज भासली नाही, असंही समोर आलं.

कोविड १९ विषाणूच्या जनुकीय सूत्राचं निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या चाचण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं केल्या जात आहेत. या अंतर्गत अकराव्या तुकडीमध्ये मुंबईतील २३० रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.



हेही वाचा

चीनमध्ये कोरोनाचा वेग वाढतोय, पालिका पुन्हा अलर्टवर

नवी मुंबईत १२-१४ वयोगटातील ६९ मुलांचे लसीकरण पूर्ण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा