Advertisement

राज्यात गुरूवारी कोरोनाचे ३२९७ नवे रुग्ण

महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २०,५२,९०५ वर पोहोचली आहे. दिवसभरात ६१०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात गुरूवारी कोरोनाचे ३२९७ नवे रुग्ण
SHARES

राज्यात  गुरूवारी कोरोनाचे ३२९७ नवे रुग्ण आढळले असून २५ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २०,५२,९०५ वर पोहोचली आहे. 

दिवसभरात ६१०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या १९,७०,०५३ इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा ५१,४१५ वर पोहोचला आहे. राज्यात सध्या ३०,२६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे ५१० नवीन रुग्ण आढळले. तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर ६२४ रुग्ण गुरूवारी बरे झाले आहेत. सध्या मुंबईत ५२५२ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यापैकी साडेतीन हजार रुग्णांना लक्षणे आहेत. १७०० रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. ३०७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.१३ टक्के झाला आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या ३ लाख १२ हजार ३०३ झाली आहे. तर एका दिवसात ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत दोन लाख ९४ हजाराहून अधिक म्हणजेच ९४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.



हेही वाचा -

कोविड चाचणी होणार आता ४९९ रुपयांत

मुंबईतील कॉलेज सुरू होण्याबाबत संभ्रम


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा