Advertisement

महिंद्रा व्हेंटिलेटरनंतर बनवताहेत मेडिकल वायझर

३० मार्च पासून कंपनी मेडिकल वायझर( medical visor) बनवीत आहे. याचा उपयोग प्रामुख्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार आहे.

महिंद्रा व्हेंटिलेटरनंतर बनवताहेत मेडिकल वायझर
SHARES

देशाला कोरोनाशी लढाईत मदतीचा हात देताना ऑटो कंपनी महिंद्रा अँड महिंद्रानं व्हेंटिलेटरचं उत्पादन सुरू केलं आहेच. पण त्या पाठोपाठ ३० मार्च पासून कंपनी मेडिकल वायझर( medical visor) बनवीत आहे. याचा उपयोग प्रामुख्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार आहे.

व्हेंटिलेटर बनवण्याची घोषणा केल्यावर कंपनीनं अवघ्या दोन दिवसात त्याचा प्रोटोटाईप बनवला असून त्याची किंमत ७ हजार ५०० रुपये आहे. आता कंपनीनं मेडिकल वायझर बनवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला त्याची ५०० युनिट तयार केली जात आहेत. नंतर आवश्यकतेनुसार त्याचं उत्पादन वाढवलं जाणार आहे. तयार झालेली मेडिकल वायझर्स डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना पोहोचवली जाणार आहेत. वायझरचा वापर केल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाचा धोका रहात नाही आणि त्यामुळे आजारी रुग्णांवर ते सहज विनाधोका उपचार करू शकतात असं सांगितलं जात आहे.

कोरोनाचा (COVID-19) वाढता प्रादुर्भाव पाहता व्हेंटिलेटरची मोठी गरज निर्माण झाली आहे. व्हेंटिलेटर यंत्रणा अधिक सुटसुटीत करून त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी एका उत्पादक कंपनीसोबत दोन मोठ्या सार्वजनिक उपक्रमांवर काम करत असल्याची माहिती पवन गोयंका (pawan goenka) यांनी दिली होती.

आयसीयू व्हेंटिलेटर बनवणाऱ्या एका स्वदेशी कंपनीसोबत ते काम करत आहेत. टीमनं तयार केलेली यंत्रणा आपत्कालीन स्थितीत (अंबु बॅग ) काही कालावधीपर्यंत रुग्णाचं जीवन वाचवण्यात सक्षम आहे. या मशिनची किंमत ५ ते १० लाख रुपयांच्या दरम्यान असली, तरी ती जवळपास ७ हजार ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा महिंद्र अँड महिंद्र कंपनीचा प्रयत्न आहे.



हेही वाचा

आरोग्य विभागात भरणार 25 हजार पदं

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, मुंबईत २ हजार आयसोलेशन बेड सज्ज!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा