आरोग्य विभागात भरणार 25 हजार पदं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या आरोग्य विभागात 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली जाणार आहेत.

आरोग्य विभागात भरणार 25 हजार पदं
SHARES
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या आरोग्य विभागात 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं भरली जाणार आहेत. लवकरच याची भरती प्रकिया सुरू करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागात अनेक पदं रिक्त आहेत. कोरोना व्हायरसच्या 
संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया थेट वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने होणार आहे.  कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत आरोग्य विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस राबत आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे आणि त्याचा सामना करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे ही पदं लवकरात लवकर भरली जाणार आहेत. 

,आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील. भरती प्रक्रियेदरम्यान गर्दी केली जाणार नाही. यासाठी रांगा नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.हेही वाचा -

एसबीआय, बँक आॅफ इंडियाचं कर्ज स्वस्त

भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष
संबंधित विषय