Advertisement

एसबीआय, बँक आॅफ इंडियाचं कर्ज स्वस्त

रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात रेपो दरात कपात करून बँकांसाठी आपलं कर्ज स्वस्त केलं. यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारं कर्ज स्वस्त होणार आहे. त्यानंतर आता बँकांनी याचा फायदा आपल्या ग्राहकांना दिला आहे.

एसबीआय, बँक आॅफ इंडियाचं कर्ज स्वस्त
SHARES

रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात रेपो दरात कपात करून बँकांसाठी आपलं कर्ज स्वस्त केलं. यामुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारं कर्ज स्वस्त होणार आहे. त्यानंतर आता बँकांनी याचा फायदा आपल्या ग्राहकांना दिला आहे.  भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि बँक ऑफ इंडियाने आता आपल्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. बँक ऑफ इंडियाने पाऊण टक्का तर स्टेट बँकेनेही पाऊण टक्का व्याजदर कमी केला आहे. व्याजदर कमी केल्याने दोन्ही बँकांचं गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त झालं आहे.   दोन्ही बँकेचे नवे कर्जदर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत.


बँक ऑफ इंडियाने  आपल्या म्हटलं की,  २७ मार्च रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.७५ टक्के कमी करून ४.४० टक्क्यांवर आणल्यानंतर बँकेने स्वतःचा बेंचमार्क कर्जदरही पाऊण टक्का कमी करून तो ७.२५ टक्क्यांवर आणला. यामुळे बँक ऑफ इंडियाची गृह, वाहन आणि एमएसएमई कर्जे स्वस्त होणार आहेत. एमसीएलआर आधारित कर्जदरही बँकेने पाव टक्का घटवला आहे. हा कर्जदर एक महिना ते एक वर्ष मुदतीच्या कर्जांसाठी तर ०.१५ टक्के कमी कर्जदर १५ दिवस मुदतीच्या कर्जांसाठी लागू करण्यात आला आहे.


स्टेट बँकेने एक्टर्नल बेंचमार्क आधारित कर्जांचा दर १ एप्रिलपासून ७.८० ट्कक्यांवरून कमी करून ७.०५ टक्क्यांवर आणला आहे. रेपो संलग्न कर्जदर ७.४० टक्क्यांवरून ६.६५ टक्क्यांवर आणला जाणार आहे. तसंच बँकेने मुदतठेवींच्या व्याजदरांमध्ये ०.२० ते १ टक्का कपात केली आहे. ही कपात मात्र २८ मार्चपासून लागू करण्यात आली आहे. घाऊक टर्म ठेवींच्या व्याजदरांत ०.५० ते १ टक्का कपात करण्यात आली आहे.हेही वाचा -

भीतीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्षसंबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा