Advertisement

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, मुंबईत २ हजार आयसोलेशन बेड सज्ज!

मुंबई महापालिका रुग्णालये, सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून साधारण २ हजार आयसोलेशन बेड सज्ज ठेवले आहेत. येत्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर या ठिकाणी उपचार केले जातील.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, मुंबईत २ हजार आयसोलेशन बेड सज्ज!
SHARES

मुंबईत कोरोनाग्रस्त (coronavirus) रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन चिंतेत आलं आहे. या वाढणाऱ्या रुग्णांच्या विलगीकरणासाठी (isolation beds) प्रशासनाने मुंबई महापालिका रुग्णालये, सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून साधारण २ हजार आयसोलेशन बेड सज्ज ठेवले आहेत. येत्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास त्यांच्यावर या ठिकाणी उपचार केले जातील. 

मुंबईत सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित (covid-19) रुग्णांची संख्या १५९ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. शुक्रवारी मुंबईत ५ आणि नागपूरमध्ये १ असे एकूण ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसंच आतापर्यंत एकूण २८ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यातील एकूण १५९ रुग्णांपैकी ५८ रुग्ण हे मुंबईतील असून त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई शहरात सद्यस्थितीत ३४७ व्यक्ती होम कॉरंटाईन आहेत.

येत्या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांच्या विलगीकरण सुविधेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालये ९०८ बेड, खाजगी रुग्णालये ३९९ बेड आणि शासकीय रुग्णालयांमध्ये ६८५ बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (mumbai guardian minister aslam sheikh) यांनी दिली. 

हे रुग्णालयं सज्ज

सध्याच्या स्थितीत बहुतेक रुग्ण हे कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. त्यापाठोपाठ परळच्या केईएम आणि जोगेश्वरीच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा केअर रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. सोबतच बोरीवलीतील भगवती, कांदिवलीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, वांद्र्यातील भाभा रुग्णालय, फोर्टमधील ईएनटी रुग्णालय आणि वडाळ्यातील कुष्ठराेग रुग्णालय, शासनाचं जे.जे रुग्णालय आणि  जीटी, जेजे आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षाकरिता अनुक्रमे २५०, ५० व २०० बेड प्रस्तावित आहेत. 

या ठिकाणीही सुविधा

मुंबई उपनगरातील माहूल येथील महापालिकेच्या ताब्यातील हजारो सदनिका विलगीकरण संकुल तयार करण्यासाठी उपयोगात आणणं शक्य आहे. कॉरंटाईन सुविधेसाठी उच्च शिक्षण मुंबई विभागाच्या शासकीय वसतिगृहात ७०० बेड, विसावा विश्रामगृह वरळी इथं २० बेड, कार्यकारी अभियंता उत्तर मुंबई, अंधेरी ४१४ बेड, पश्चिम रेल्वे ९५ बेड, मध्य रेल्वे १८० बेड, हॉटेल्समध्ये ३६७ रुमचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील शेख यांनी दिली.


हेही वाचा-

महाराष्ट्रात एप्रिल-मे पर्यंत कोरोनाचे ३ कोटी रुग्ण?, अमेरिकेतल्या संस्थेचा अहवाल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा