Advertisement

उगाच पुढारपणं कशाला करता?, गप्प घरातच बसा- जयंत पाटील

आपल्याला काहीच होणार नाही, असा अति आत्मविश्वास बाळगू नका. काही लोकांना पुढारपण करण्याची सवय असते. त्यांनी पुढारपण न करता घरातचं बसावं, असा सल्ला राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी दिला.

उगाच पुढारपणं कशाला करता?, गप्प घरातच बसा- जयंत पाटील
SHARES

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने काही नियम आखले होते. मात्र आता ते नियम आणखी कडक केले जात आहे. आपल्याला काहीच होणार नाही, असा अति आत्मविश्वास बाळगू नका. काही लोकांना पुढारपण करण्याची सवय असते. त्यांनी पुढारपण न करता घरातचं बसावं, असा सल्ला राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी दिला. पाटील यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला तसंच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत गोंधळ दूर करण्याचाही प्रयत्न केला.

हेही वाचा - Coronavirus Updates: आपण कोरोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात- मुख्यमंत्री

यावेळी ते म्हणाले, संचारबंदीच्या (curfew) काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास (essentials) उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. तरीही काही लोकं खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने घोळका करून घराबाहेर पडत आहेत. या घोळक्यामधील कुणालाही कोरोनाची लागण झालेली असून शकते, याचं लोकांनी भान ठेवायला हवं.

कोरोना व्हायरसचा (covid-19) संसर्ग किती गंभीर आहे, हे जगभरातील आकडेवारी पाहिल्यानंतर लक्षात येतं. हा आजार संपर्क आणि संसर्गाने होत असल्याने अमेरिका, चीन, इटली, स्पेन आणि जर्मनीतील लोकं घराच्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळे तुम्ही देखील घरातच राहा. बाहेर फिरू नका. आपल्याला काहीच होणार नाही, असा अति आत्मविश्वास बाळगू नका. काही लोकांना उगाच पुढारपण करायची सवय असते, त्यांनही पुढारपण न करता घरातच बसावं.

परदेशातून आलेल्या व्यक्ती तसंच कोरोना संशयितांच्या हातावर होम क्वारंटाईनचा (home quarinetine) शिक्का मारण्यात आला आहे. असा हातावर शिक्का मारलेली व्यक्ती तुम्हाला बाहेर फिरताना आढळून आली, तर पोलिसांना तात्काळ कळवा. प्रशासनाला त्याची माहिती द्या. स्वत: सोबत इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असंही जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा - महाराष्ट्रात एप्रिल-मे पर्यंत कोरोनाचे ३ कोटी रुग्ण?, अमेरिकेतल्या संस्थेचा अहवाल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा