Advertisement

मलेरिया, गॅस्ट्रो व लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ

कोरोनासोबतच मलेरिया, गॅस्ट्रो आणि लेप्टोने या साथीच्या आजारांनी पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे.

मलेरिया, गॅस्ट्रो व लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ
SHARES

मुंबईत दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळं महापालिकेनं सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. परंतु, आता कोरोनासोबतच मलेरिया, गॅस्ट्रो आणि लेप्टोने या साथीच्या आजारांनी पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. कोरोना रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहे, त्यात आता मलेरिया, गॅस्ट्रो आणि लेप्टोचं आव्हान महापालिकेसमोर वाढलं आहे.

मुंबईत नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत मलेरियाचे २४९ रुग्ण, गॅस्ट्रोचे १२७ आणि लेप्टोचे २३ रुग्ण आढळले आहेत. या आजारांमुळं नोव्हेंबरमध्ये एकही मृत्यू झाला नसून, महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेनं सुरू असलेल्या उपाययोजनांमुळं मुंबईत कोरोना आता चांगलाच नियंत्रणात आला आहे. मात्र रात्री थंडी आणि दिवसा उकाडा अशा विषम वातावरणामुळं मुंबईत इतर आजार वाढत आहेत.

गतवर्षीच्या नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये मलेरियाचे २९९, लेप्टो ३२, डेंग्यू १८०, गॅस्ट्रो ५३५, हिपेटायटिस ७३ आणि एच1एन1चे ३ रुग्ण आढळले होते. तर यावर्षी २ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत मलेरियाचे ९०, ९ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत ७८ आणि १६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ८१ रुग्ण आढळले आहेत. तर लेप्टोचे २ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत २३ रुग्ण आढळले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा