Advertisement

ओमिक्रॉनचा शिरकाव, २ रुग्ण आढळल्यानंतर महापौर म्हणाल्या...

महाराष्ट्रातील शेजारच्याच राज्यात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत.

ओमिक्रॉनचा शिरकाव, २ रुग्ण आढळल्यानंतर महापौर म्हणाल्या...
SHARES

भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटनं शिरकाव केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषदेद्वारे दिली. महाराष्ट्राचं शेजारचं राज्य कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परीषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी मुंबईत अद्यापपर्यंत एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत परराज्यातून येणाऱ्यांना लसीकरण किंवा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य आहे.

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनं तुफान धुमाकूळ घातला होता. ज्यानंतर आता ओमिक्रॉनमुळे पुन्हा मोठी हानी होऊ नये, यासाठी प्रशासन उपाययोजना करताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील २९ देशात ३७३ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉनचा व्हेरियंट बीटा आणि डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, या व्हेरियंटमध्ये आतापर्यंत ४२ ते ५२ म्युटेशन आढळले आहेत. आतापर्यंत आलेल्या अहवाला नुसार हा व्हेरियंट जास्त तीव्रतेचा नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ओमिक्रॉन (Omicron) या विषाणूचा संसर्ग झालेले ४ संशयित रुग्ण मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. या रुग्णांच्या 'एच जीन'च्या चाचण्या करण्यासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे का, हे स्पष्ट होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

परदेशातून प्रवास करून भारतात आलेल्या व्यक्तींच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. या याद्यांच्या मदतीनं संबधित व्यक्तींशी संपर्क साधण्यात येत होता. यापैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



हेही वाचा

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना शासनाची मदत, 'असा' करा ऑनलाईन अर्ज

केंद्राच्या विरोधानंतर महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी 'या' आहेत नव्या गाईडलाईन्स

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा