Advertisement

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना शासनाची मदत, 'असा' करा ऑनलाईन अर्ज

केंद्र सरकारनं नुकतंच कोविडमध्ये मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजारांची आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं.

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना शासनाची मदत, 'असा' करा ऑनलाईन अर्ज
SHARES

महाराष्ट्र सरकारनं बुधवारी, १ डिसेंबर रोजी जवळजवळ तीन महिन्यांच्या विलंबानंतर एक वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाईटद्वारे कोविड-१९ मृतकांचे कुटुंबीय ऑनलाईन अर्ज करू शकतात.

केंद्र सरकारनं नुकतंच कोविडमध्ये मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजारांची आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता ही मदत करण्यासाठीच वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.  

केंद्र सरकारनं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व राज्यांना त्यांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) मदत देण्यास सांगितलं होतं. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांनुसार, राज्यांनी अर्ज केल्याच्या ३० दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम ऑफर करावी लागेल, असं नमूद केलं आहे.

या निर्देशांचा विचार करून, राज्य सरकारनं एक वेबसाइट सुरू केली आहे. https://mahacovid19relief.in/login अशी ही वेबसाईट आहे. यामध्ये कुटुंबास सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करता येईल. अर्जदार त्यांच्या मोबाईल फोनद्वारे लॉगइन करू शकतात.

हे पोस्ट केल्यानंतर, त्यांना त्यांच्या आधार क्रमांकासह मृत सदस्यांचे तपशील टाकणे आवश्यक असेल. याव्यतिरिक्त, मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालय तपशील अपलोड करण्याचा पर्याय आहे.

अहवालाच्या आधारे, सकारात्मक RT-PCR, RAT परिणाम आणि COVID-19 मृत्यू प्रमाणपत्र नसलेले कुटुंब देखील अतिरिक्त अनुदानाची रक्कम मिळवू शकतात. फक्त त्यासाठी एकच अट आहे ती म्हणजे मृत व्यक्तीचा रुग्णालयात वैद्यकीयदृष्ट्या निदान झाल्यापासून ३० दिवसांच्या आत मृत्यू झाला असेल.

वेबसाइटवर आठवडाभरात मंजूर अर्जांची नावे उपलब्ध करून दिली जातील. काही जणांचा दावा आहे की, राज्यात १.४ लाख मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानुसार या सर्व कुटुंबांना मदत करण्यासाठी ७०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असेल.हेही वाचा

केंद्राच्या विरोधानंतर महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी 'या' आहेत नव्या गाईडलाईन्स

ओमिक्रॉन : ४ संशयित रुग्ण सेव्हन हिल रुग्णालयात दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा