Advertisement

केंद्राच्या विरोधानंतर महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी 'या' आहेत नव्या गाईडलाईन्स

अखेर राज्यानं लागू केलेल्या गाईडलाईन्समध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

केंद्राच्या विरोधानंतर महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी 'या' आहेत नव्या गाईडलाईन्स
(Representational Image)
SHARES

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं (Omicron Variant) जगाची धाकधूक वाढवली आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

राज्यानं देखील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्यात. यापूर्वी राज्यानं जाहीर केलेल्या गाईडलाईन्सवर केंद्राकडून विरोध करण्यात आला होता. अखेर राज्यानं लागू केलेल्या गाईडलाईन्समध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

संपूर्ण भारतामध्ये मार्गदर्शक तत्त्वांची एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केंद्राकडून विरोध झाल्यानंतर गाईडलाईन्समध्ये बदल करण्यात आले आहेत.

  • केवळ ६ "अति-जोखीम देशां"मधल्या प्रवाशांना महाराष्ट्रात संस्थात्मक विलगीकरणात ठेवणं आवश्यक आहे. अति-जोखीम असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) ग्रस्त देशांच्या यादीत दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, नामिबिया, झिम्बाब्वे, इस्वाटिनी आणि लेसोथो यांचा समावेश आहे.
  • देशांतर्गत प्रवासासाठी ७२ तासांपर्यंतचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे.
  • लशीच्या दोन डोसच्या प्रमाणपत्रासह मुंबई विमानतळावर कोविड निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा असून आरटीपीसीआर रिपोर्ट नसल्यास विमानतळावर कोरोना चाचणी केली जाणार आहे.
  • मुंबईहून कनेक्टिंग फ्लाईटकरता देखील आरटीपीसीआर करणं बंधनकारक, डोमेस्टिक प्रवाशांनाही RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य
  • महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक डॉमेस्टिक फ्लाईटमधील प्रवाशांना ४८ तासाआधी आरटीपीसीआर चाचणी अहवाल करणं बंधनकारक
  • राज्यांतर्गत शहरांमध्ये प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक
  • दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असेल तर RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्यहेही वाचा

ओमिक्रॉन : ४ संशयित रुग्ण सेव्हन हिल रुग्णालयात दाखल

कोविशिल्डच्या बूस्टर डोसला मंजुरी द्या, सीरमची DCGIकडे मागणी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा