Advertisement

प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांचा संप : २ महिन्यात वेतनवाढीवर मार्ग काढण्याचे अाश्वासन


प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांचा संप :  २ महिन्यात वेतनवाढीवर मार्ग काढण्याचे अाश्वासन
SHARES

प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांनी पुकारलेला संप मंगळवारी सहावा दिवशीही सुरू अाहे. या संपावर अाता सकारात्मक तोडगा निघण्याची चिन्हं अाहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी २ महिन्यात वेतनवाढीवर चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असं अाश्वासन प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना दिलं अाहे.  


अर्थमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

प्रशिक्षणार्थी डॉक्टर संघटनेचे व्यवस्थापकीय सचिव डॉ. गोकुळ राख म्हणाले की,  शनिवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर आमची बैठक झाली. ही बैठक सकारात्मक होती. अर्थसंकल्पात वैद्यकीय शिक्षणासाठी नवी धोरणे आखून विद्यावेतनात वाढ होईल याकडे लक्ष देऊ असे मुनगंटीवार यांनी सांगितलं. मात्र,  आमच्या मागण्या लिखीत स्वरूपात आम्हाला मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असंही डॉ. गोकुळ यांनी सांगितलं.

विद्यावेतन वाढवून मिळण्यासाठी राज्यातील  प्रशिक्षणार्थी डाॅक्टर १३ जूनपासून संपावर अाहेत. इतर राज्यात प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांना १५ हजार रुपयांपेक्षा अधिक विद्यावेतन मिळते. मात्र, राज्यात त्यांना फक्त ६ हजार रुपये विद्यावेतन दिलं जातं. 



हेही वाचा - 

महड विषबाधा प्रकरण : काहींना मुंबईतल्या रुग्णालयात हलवलं

रेल्वेचा बडगा! ८ वन रूपी क्लिनिकचं शटर डाऊन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा