Advertisement

ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर मशीन या उपकरणांचा घरी उपयोग करणं फायदेशीर की नुकसानकारक?

या कोरोनाच्या काळात विशेष काळजी घेण्यासाठी थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन), पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मशीन, ईसीजी मॉनिटर, डिजीटल वॉच ही सर्व उपकरणं आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.

ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर मशीन या उपकरणांचा घरी उपयोग करणं फायदेशीर की नुकसानकारक?
SHARES

यंदा कोरोना काळात आरोग्याची नियमित तपासणी करावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला होता. शिवाय, कोरोना या जिवघेण्या व्हायरसमुळं नागरिक रुग्णालय व डॉक्टरांकडं जाणं टाळत असून, अनेकजण घरच्याघरीच उपचार घेत होते. या कोरोनाच्या काळात विशेष काळजी घेण्यासाठी थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन), पल्स ऑक्सिमीटर, ब्लड प्रेशर मशीन, ईसीजी मॉनिटर, डिजीटल वॉच ही सर्व उपकरणं आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळं या उपकरणांना दिवसेंदिवस मागणीही वाढत चालली आहे.

मात्र, या उपकरणांचा वापर खरचं योग्य आहे का? अशा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे. या उपकरणामुळं आपण डॉक्टरांकडं किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं टाळत असल्याचंही बोललं जात आहे. सध्या बर्‍याच रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु आहेत. त्यामुळं आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात जाणं असुरक्षित वाटू लागलं आहे. त्यामुळे अनेकांनी ही वैद्यकीय साधनं घरातचं ऑर्डर करुन वापरण्यास सुरुवात केली आहे.

काहींसाठी ती फार उपयुक्त ठरत आहेत. या उपकरणांच्या मदतीनं डॉक्टरांकडं फक्त चेकअपसाठी जाण्यास अनेक जण टाळाटाळ करतात. पण ही उपकरणं वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला हा अत्यंत गरजेचे आहे.

नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मामीटर

सध्या सर्व ठिकाणी नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मामीटरचा उपयोग केला जातो. शरीराचे तापमान मोजण्यासाठी हे उपकरणं वापरले जाते. थर्मामीटरच्या मदतीने आपण स्वतःचे आणि आपल्या घरातील सदस्यांचे शरीराचे तापमान सहज तपासू शकता.

डिजीटल मॉनिटर ब्लडप्रेशर मशीन

डिजीटल मॉनिटर ब्लडप्रेशर मशीनच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी रक्तदाब तपासू शकता. या मशीनच्या मदतीने तुम्ही प्लस रेटही मोजू शकता. ही मशीन बाजारात सहजरित्या उपलब्ध आहे.

पल्स ऑक्समीटर

पल्स ऑक्समीटरच्या सहाय्याने तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजता येते. हे मशीन लहान असेल, तरी अतिशय उपयुक्त ठरते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर याचा वापर आपल्याला करता येतो.

ग्लुकोमीटर

ग्लुकोमीटरच्या मदतीने आपण शरीराच्या ग्लुकोज पातळी शोधू शकता. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी रक्तातील साखरेची पातळी तपासू शकता. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त आहे.

पोर्टेबल पर्सनल ईसीजी मॉनिटर

पोर्टेबल पर्सनल ईसीजी मॉनिटरच्या मदतीने आपण ईसीजी मॉनिटर करु शकतो. मात्र या उपकरणाचा वापर करतेवेळी डॉक्टरांचा सल्ला उपयोगी ठरतो.

कोरोनापूर्वी या सर्व उपकरणांची नावंही सर्वसामान्य लोकांना माहिती नव्हती. अनेकांनी केवळ डॉक्टरकडेच ही उपकरण बघितली असतील. मात्र, कोरोना काळात या सर्व उपकरणांची मागणी प्रचंड वाढली आहे. कोरोनापूर्वी ही सर्व उपकरणं अगदी तुरळक विकली जात होती. मात्र, सध्या या सर्व उपकरणांची खप प्रचंड होत आहे.

काही महिन्यापूर्वी ही जवळपास १० ते २० च्या संख्येत विकली जात होती. मात्र, आता दर दिवसाला ५०० उपकरणांची विक्री होत असल्याचंही बोललं जात आहे. लोकांमध्ये आरोग्यप्रती जागरुकता वाढली आहे. त्यामुळंच या उपकरणांची विक्री वाढल्याचं स्पष्ट होत आहे. घरी तापमान आणि ऑक्सिजन पातळी मोजण्यासाठी अनेकांनी ही उपकरणं खरेदी केली आहे.

सध्या वापरल्या जाणाऱ्या या उपकरणांची किंमत कमी असते. मात्र, याचा खप वाढला की याच्या किंमती अनेकदा अव्वाच्या सव्वा वाढवून सांगितल्या जातात. त्यामुळे ग्राहकांना याचा अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. तसेच अनेकदा ही उपकरण चालू स्थितीत आहेत का? ती योग्य निदान दाखवतात की नाही? याचा आपल्याला काहीही अभ्यास नसतो. त्या संबंधित उपकरणाने दाखवलेले निदान योग्य आहे, असा समज आपण करुन घेतो.

डॉक्टरांचा सल्ला

कित्येकदा ही उपकरणं कशी वापरायची याची रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना काहीही माहिती नसतं. त्यामुळं इंटरनेट किंवा सोशल मीडियाच्या मदतीनं आपण त्या उपकरणाचा वापर करतो. त्यानं दाखवलेल्या निदानाचा नेमका अर्थ काय? हे देखील आपण ऑनलाईनच्या माध्यमातून जाणून घेतो. मात्र, तो बरोबर आहे की चुकीचा, याची माहिती तज्ज्ञांइतकी आपल्याला नसतं. त्यामुळं ही घरगुती मेडिकल उपकरण वापरताना डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

एखादे घरगुती मेडिकल उपकरण नेमकं कसं वापरतात? त्याच्या निदानाचा अर्थ काय? रुग्णाला याचा फायदा किती आहे? या सर्व प्रश्नांची नीट माहिती घेऊनच आपण त्याचा वापर करायला हवा.

ही मेडिकल उपकरणं काही विशिष्ट प्रोगामिंगच्या आधारे बनवले जातात. जर यात काही त्रुटी आढळल्यास किंवा बग निर्माण झाल्या ते रुग्णांसाठी हानिकारक ठरु शकते. जर या मशीने एखाद्या रुग्णाचे चुकीचे निदान दर्शवले आणि त्या निदानाप्रमाणे त्या रुग्णाने उपचार घेतले तर त्या रुग्णांची तब्ब्येतीवर परिणाम होऊ शकतात.

वापर फायदेशीर की नुकसानकारक

या मेडिकल उपकरणांचा वापर हा फायदेशीर की नुकसानकारक हे सांगणं फार अवघड आहे. काळाची गरज म्हणून बनवण्यात आलेली ही उपकरण अनकेदा फायदेशीर ठरतात. मात्र कित्येदा या उपकरणांचा अतिरेक फार धोकादायक धरु शकतो. त्यामुळे या मेडिकल उपकरणांचा वापर कधी आणि कुठे करायचा याबाबत तज्ज्ञांचा सल्ला फायदेशीर ठरतो. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा