Advertisement

धारावीत कोरोना रुग्णांमध्ये तरुणांची संख्या अधिक

धक्कादायक बाब म्हणजे धारावीत करोनाबाधितांमध्ये 21 ते 40 वयोगटातील तरुणांचाच सर्वाधिक समावेश असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

धारावीत कोरोना रुग्णांमध्ये तरुणांची संख्या अधिक
SHARES
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. तर मुंबईत धारावी कोरोना रुग्णांचा हाॅटस्पाॅट झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे धारावीत करोनाबाधितांमध्ये 21 ते 40 वयोगटातील तरुणांचाच सर्वाधिक समावेश असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. 


मुंबईत रविवारी कोरोनाचे 441 नवे रुग्ण सापडले. यामध्ये धारावीतील  रुग्णांची संख्या 94 आहे. आता धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 590 वर गेली आहे. कोरोनाचा संसर्ग हा ज्येष्ठांना होत असल्याचं आजपर्यंत आढळून आलं होतं. मात्र आता तरुणांची संख्या यामध्ये अधिक आहे.

आरोग्य प्रशासनाने  जारी केलेल्या आकडेवारीनुसार धारावीत 21 ते 39 वयोगट आणि 31 ते 40 वयोगटातील प्रत्येकी 86 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 4 ते 50 वयोगटातील 85 लोकांना आणि 51 ते 60 वयोगटातील 53 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय 10 ते 20 वयोगटातील 6 मुलांनाही करोनाची लागण झाली आहे. 


तरुणांकडून लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं जात नाही. त्यामुळे हे तरुण कोरोनाला बळी पडत आहेत. तरुणांनी घराबाहेर पडू नये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं याचं पालिकेकडून वारंवार आवाहन केलं जात आहे. तरीही तरुण वर्गाकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने तरुणांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत आहे.



हेही वाचा -

मुंबई, पुण्यातील रेड झोनमध्येही ४ मेपासून मद्यविक्री सुरू

तर, ११ लाख परप्रांतीयांना सोडण्यासाठी लागतील इतक्या ट्रेन आणि बस..




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा