Advertisement

दिलासादायक! म्युकर मायकोसिसची बाधा झालेल्या 'इतक्या' रुग्णांना वाचविण्यात यश


दिलासादायक! म्युकर मायकोसिसची बाधा झालेल्या 'इतक्या' रुग्णांना वाचविण्यात यश
SHARES

मुंबईसह राज्यभरात गतवर्षी कोरोना या जीवघेण्या व्हायरसनं धुमाकूळ घातला होता. राज्यातील अनेकांना आपला जीव या व्हायरसमुळे गमवावा लागला. याचवेळी राज्यातील जनतेसमोर आणखी एक संकट उभे राहिले होते. ते म्हणजे म्युकर मायकोसिस. या आजारामुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत होता. मात्र सद्यस्थितीत मुंबईसह राज्यातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात १० ऑक्टोबरपर्यंत म्युकर मायकोसिसच्या १०२६६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील ८८९० रुग्ण बरे झाले असून १३७६ जणांना या आजारामुळे प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात म्युकर मायकोसिसमुळे सर्वाधिक मृत्यू हे मुंबईमध्ये झाले आहेत.

मुंबईत १९३ जणांनी या व्याधीमुळे प्राण गमावला असून पुण्यात त्या खालोखाल १९१ जणांना म्युकर मायकोसिसच्या संसर्गामुळे प्राण गमवावे लागले. दुसरी लाट ओसरताना नागपूरमध्ये या आजारामुळे मृत्यूची संख्या सर्वाधिक होती. आता त्यात घट झाली असून येथे म्युकरचे १५८ बळी ठरले.

१० ऑक्टोबरपर्यंत राज्यात दहा हजार रुग्णांना म्युकर मायकोसिसचा संसर्ग झाला असला तरीही त्यातून ८५०० रुग्णांचे जीव वाचवणे शक्य झाले आहे. योग्यवेळी केलेले निदान, वैद्यकीय उपचारांची त्वरित झालेली सुरवात आणि दीर्घकालीन उपचार देताना विविध विभागांमधील वैद्यकीय तज्ज्ञांना सोबत घेऊन दिलेल्या समग्र उपचारपद्धतीचा लाभ झाल्याचे दिसून येते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा